News Flash

‘शोले-थ्रीडी’च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

स्वामित्त्व हक्कावरून पुतण्यासोबत झालेल्या वादानंतर ‘शोले-थ्रीडी’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी प्रसिद्ध निर्माते रमेश सिप्पी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

| December 4, 2013 02:05 am

‘शोले-थ्रीडी’च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील

स्वामित्त्व हक्कावरून पुतण्यासोबत झालेल्या वादानंतर ‘शोले-थ्रीडी’च्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी प्रसिद्ध निर्माते रमेश सिप्पी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने सिनेमाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार देत सिप्पी यांना दणका दिला.
सिप्पी यांनी चित्रपटाच्या स्वामित्त्व हक्कावरून पुतण्याविरोधात दावा दाखल केला होता. तसेच चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय पीठाने सिप्पी यांचा दावा फेटाळला. त्यानंतर सिप्पी यांनी खंडपीठासमोर त्या निर्णयाला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एस. एफ. वझिफदार आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर सिप्पी यांच्या अपिलावर सुनावणी झाली असता न्यायालयाने सिप्पी यांचे अपील फेटाळून लावत एकसदस्यीय पीठाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ‘शोले थ्रीडी’च्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2013 2:05 am

Web Title: 3d sholay get green for exhibition
टॅग : Sholay
Next Stories
1 बिपाशा सुरू करणार ‘फॅशनेबल वस्तूं’चे स्टोअर
2 अभिनेता राजपाल यादवला तुरुंगवास
3 चाहत्यांसोबत सलमान करणार ‘जय हो’चा ट्रेलर लाँच
Just Now!
X