18 February 2020

News Flash

आमिर म्हणतो; यशाला स्त्री -पुरुष असा चेहरा नसतो!

आमिरच्या पंजाबी लूकचे गुढ उकलले.

आमिरचा जाहिरातीतील नवा लूक

बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘दंगल’ चित्रपटातून महिला सबलीकरणाची एक मिसाल दाखवून दिली होती. या चित्रपटात आमिर त्याच्या मुलींना म्हणजे फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांना आखाड्यात कुस्तीचे धडे देताना दिसला होता. महिलांच्या अंगी असणारे बळ दाखवून देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आमिरने महिला सबलीकरणाचे आणखी एक उदाहरण दाखवून दिले आहे. यासाठी आमिर एखाद्या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही, तर एका जाहिरातीच्या माध्यमातून तो महिलांची ताकद वाढविताना दिसत आहे.

 

यश हे स्त्री-पुरुष अशा लिंग भेदावर अवलंबून नसते, असा संदेश आमिर खानने या जाहिरातीतून दिला आहे. आमिरने हा व्हिडिओ फेसबुकटच्या माध्यमातून शेअर केला असू सोशल मी़डियावर या व्हिडिओची दंगल सुरु असल्याचे दिसते. गेल्या काही दिवसांपासून आमिरचा लूक चांगलाच चर्चत आला होता. या लूकमध्ये आमिर आपल्याला पिळदार मिश्या आणि दाढीत दिसला होता. आमिरचा हा लूक त्याने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या आगामी चित्रपटासाठी असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, पिळदार मिश्या, दाढी आणि डोक्यावर लाल रंगाची पगडी बांधलेला आमिरचा पंजाबी लूक हा चित्रपटासाठी नव्हे, तर जाहिरातीसाठी असल्याचे स्पष्ट झाले आहे. बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हे दोन कलाकार आपल्याला लवकरच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. बिग बींसोबतच्या या प्रोजेक्टसाठी आमिर खूपच उत्साहात आहे. पुढच्या दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणा-या या चित्रपटात बॉलीवूडचे हे दोन आघाडीचे कलाकार पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

आमिर खान याच्या ‘दंगल’ चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. गतवर्षीच्या सरशेवटी २३ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाईचा विक्रम तर केलाच आहे. पण भारतामध्ये धमाकेदार कमाई केल्यानंतर हा चित्रपट परदेशातदेखील सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. आमिरसह फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांनी देखील वाहवाह मिळवली. बहुचर्चित चित्रपटावर चौहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. ‘दंगल’ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आमिरने पिळदार शरीरयष्टीसाठी केलेल्या मेहनतीचे देखील कौतुक झाले होते. याच वेळी महावीर सिंग फोगट साकारत असताना आमिरने दोन रुपातील व्हिडिओची देखील चांगलीच चर्चा रंगली होती.

First Published on February 26, 2017 10:31 am

Web Title: aamir khan strong message for girl child
Next Stories
1 Oscars 2017 : ऑस्करमधील काळे-गोरे!
2 Oscars 2017 : कठोरोत्तम स्त्रीदर्शन!
3 Oscars 2017 : कलिना ते ‘लायन’ छोटय़ा सनीचा मोठा प्रवास
Just Now!
X