News Flash

अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्याने अभिषेक चाहत्याला म्हणाला, “कुणीही त्यांच्यापेक्षा..”

सोशल मीडियावर ट्विट व्हायरल

अभिनेता अभिषक बच्चनचा काही दिवसांपूर्वीच ‘बिग बुल’ हा सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमातील अभिषेकचा अभिनय पाहून काहिंनी त्याचं कौतुक केलं. तर अनेकांनी त्याला ट्रोलदेखील केलं. नुकतच एका चाहत्याने अभिषेकचा हा सिनेमा पाहून ट्विट केलंय. यात त्याने अभिषेकची तुलना बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशी केलीय.

तर अभिषेक बच्चनने देखील चाहत्याला खास अंदाजात उत्तर दिलंय. चाहत्याने अभिषेकचा बिग बुल सिनेमा पाहून एक ट्विट केलंय. यात तो म्हणाला, “बिग बुल सिनेमा पाहिला, मला वाटतं जेव्हा अभिनयाची गोष्ट येते तेव्हा तुम्ही बिग बींपेक्षा उत्तम आहात. ” असं म्हणत चाहत्याने अभिषेकचा अभिनय अमितात्र बच्चन यांच्यापेक्षा उत्तम असल्याचं म्हंटलं आहे.

चाहत्याच्या प्रशंसेवर अभिषेकने उत्तर दिलंय. तो म्हणाला, ” तुम्ही केलेल्या कौतुकासाठी खूप खूप धन्यवाद सर. मात्र कुणीही, कुणीही त्यांच्यापेक्षा उत्तम नसू शकतं.” असं म्हणच बिग बीचं सगळ्यात बेस्ट आहेत असं अभिषेक म्हणाला आहे. अभिषेकचं हे ट्विट सध्या चांगलच व्हायरल होतंय.

दरम्यान या सिनेमामुळे अभिषेक बच्चन चांगलाच चर्चेत आला होता. बिग बुल पाहिल्यानंतर बिंग बींनी देखील अभिषेकचं कौतुक केलं होतं. WHTCTW मस्त मित्रा. वडिलांचा अभिमान. जेव्हा मुलगा वडिलांचे शूज घालायला लागतो तेव्हा तो तुमचा मुलगा नव्हे मित्र होतो. खूप चांगलं केलं मित्रा” अशा आशयाचं ट्विट करत बिग बींनी अभिषेकचं कौतुक केलं होतं. मात्र यानंतर बिग बी ट्रोल झाले. मुलाचं खोट कौतुक केल्याचा आरोप करत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:06 pm

Web Title: abhishek bachchan reply to fan who compare him with amitabh bachchan said nobody can be better than him kpw 89
Next Stories
1 “आईमुळे ‘ही’ गोष्ट शिकले”, ‘असं’ आहे आई आणि माऊचं नातं
2 अनिरूद्ध दवेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ; केली करोनावर मात
3 ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी’ च्या दिग्दर्शकाला आवडला हा भारतीय चित्रपट
Just Now!
X