News Flash

‘या’ बॅण्डमध्ये सामील झाला सोनू सूद ; म्हणाला “लग्नासाठी त्वरित संपर्क साधा”

"आमचा बॅण्ड एकदम जबरदस्त आहे"

(photo-instagram@soonu-sood)

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद अनेकांच्या मदतीसाठी धावून गेला. सोनू सूद सातत्याने गरजुंची मदत करत आहे. त्यामुळे अनेक जण त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सोनू सूदची मदत घेताना दिसतात. बेरोजगार तरुण असो किंवा परीक्षार्थी विद्यार्थी सोनूने अनेकांना आजवर पाठिंबा दिला आहे.

सोनूने बेरोजगारांना मदत करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे. सोनूच्या या कामगिरीमुळे देशात त्याच्या चाहत्यांची संख्या मोठी वाढली आहे. सोनूने नुकताच एक व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तो बॅण्डवाला बनल्याचं दिसतंय. तसचं कॅप्शनमध्येही त्याने “बॅण्डवाला, लग्नासाठी त्वरित संपर्क साधा” असं म्हंटलं आहे.

या व्हिडीओत सोनू सूदसोबत दोन व्यक्ती दिसतं आहेत. या व्यक्तींची सोनूने ओळख करून दिली आहे. “बॉस केव्हाही लग्न असले तर आमचा बॅण्ड एकदम जबरदस्त आहे. तुम्ही कृपा करून आमचा बॅण्ड जाईन करा. सुरेशजी आणि वासूजी चला सुरू करा.” असं म्हणत सोनूने दोघांसोबत बॅण्ड वाजवण्यास सुरूवात केली. सोनूचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांनी सोनूचं कौतुक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

याआधी सोनूने सेटवर डोसा बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. “ज्या कलाकाराला डोसा बनवता येतो त्याला निर्माते पसंती देतात. कारण मग त्यांचा खाण्यापिण्याचा खर्च वाचतो. कलाकार स्वतःच स्वतःसाठी बनवेल आणि खाईल. त्यामुळे जे ऍक्टर होऊ इच्छितात, त्यांनी स्वतःसाठी डोसा बनवायला शिकावं.” असं तो या व्हिडीओत म्हणाला होता.

“२५ वर्षांपुढील सर्वांना लस उपलब्ध करावी”, सोनू सूदची सरकारकडे मागणी

दरम्यान सोनूने दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणं गरजेचं असल्याचं म्हंटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 1:58 pm

Web Title: actor soonu sood share video as he become bandwala supporting band team kpw 89
Next Stories
1 Viral Video: ‘या’ चुकीमुळे रितेशला खावा लागला चपलेने मार
2 ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात
3 ‘या’ अभिनेत्याला अनन्या पांडेने केलं होतं पहिलं किस, म्हणाली “आतापर्यंतचं…”
Just Now!
X