News Flash

नीति मोहनने शेअर केली मुलगा आर्यवीरची पहिली झलक; क्यूट फोटो पाहून अनुष्का शर्मा म्हणाली…

नीतिने शेअर केलेल्या एका फोटोत निहार आणि नीति आपल्या बाळाकडे आनंदाने पाहत असल्याचं दिसतंय.

(Photo-Instagram@neetimohan18)

अभिनेता निहार पांड्याची पत्नी आणि गायिका नीति मोहन नुकतीच आई झालीय. २ जूनला नीतिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर आता नीतिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केलीय. याचसोबत नीतिने त्यांच्या मुलाचं नाव देखील जाहीर केलंय. नीतिने इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केले असून यात निहारसुद्धा आहे.

नीतिने शेअर केलेल्या एका फोटोत निहार आणि नीति आपल्या बाळाकडे आनंदाने पाहत असल्याचं दिसतंय. तर एका फोटोत निहार आणि नीतिने मुलाल मांडिवर घेतल्याचं पाहायला मिळतंय. नीतिने त्यांच्या या पूर्णत्वास आलेल्या छोट्याश्या कुटुंबाचे क्यूट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील तिच्या फोटोला पसंती दिलीय. तर अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील नीतिच्या या फोटोंवर कमेंट केली आहे. “तुमच्या सारख्या दोन सुंदर व्यक्तींना माझ्याकडून शुभेच्छा” अशी कमेंट अनुष्काने केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by NEETI MOHAN (@neetimohan18)

हे देखील वाचा: Viral Video: “मला वाटलं कुणी हॉलिवूड स्टार आहे”; अर्जुन रामपालचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

नीतिने हे फोटो शेअर करत एक सुंदर कॅप्शन दिलंय. “या नाजूक हातांना पकडणं हे आता पर्यंतचे सर्वात सुंदर क्षण आहेत. आर्यवीरने आम्हाला आई-वडील म्हणून निवडलं आहे. याहून चांगले आशिर्वाद काय असणार. त्याने आमच्या आयुष्यात आनंद वाढवलायं.” नीति मोहनच्या या पोस्टवर तिची बहिण मुक्तीने देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं अभिनेत्री मौनी रॉय, पंखुडी अवस्थी आणि अभिनेत्री अपारशक्ति खुराना यांनी देखील कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बापूजींचं हे रुप पाहिलंत का?; पत्नी आहे खूपच ग्लॅमरस

 

View this post on Instagram

 

A post shared by NEETI MOHAN (@neetimohan18)

दरम्यान, मुलाच्या जन्मानंतर निहारने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. “माझ्या वडिलांनी जे मला शिवकलं ते माझ्या मुलाला शिवकण्याची संधी माझ्या पत्नीने मला दिली आहे. प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यात आनंद पसरवत आहे.” असं म्हणत निहारने एक सुंदर पोस्ट शेअर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 11:22 am

Web Title: actot nihar pandya and singer neeti mohan welcome baby boy share his first photo and name anushka sharma comment kpw 89
Next Stories
1 ‘निर्मात्याने मला हॉटेल रूममध्ये…’, नीना गुप्ता यांनी सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव
2 नोराचा अनोखा बिकिनी लूक पाहून वरुण धवनला हसू अनावर, पाहा व्हिडीओ
3 Viral Video: “मला वाटलं कुणी हॉलिवूड स्टार आहे”; अर्जुन रामपालचा नवा लूक पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
Just Now!
X