News Flash

“इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका”; लसीकरणाचे व्हिडीओ शेअर करणाऱ्यांना आशा नेगीने फटकारलं

आशाच्या पोस्टला चाहत्यांची पसंती

देशात अनेक ठिकाणी 18 वर्षांवरील सर्वांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी देखील करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावर फोटो तसचं व्हिडीओ शेअर करत या सेलिब्रिटींनी लस घेतल्याची माहिती दिली आहे. सोबतच अनेकांनी चाहत्यांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

मात्र लसीकरणाचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या कलाकारांना अभिनेत्री आशा नेगीने फटकारलं आहे. आशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केलीय. या पोस्टमध्ये ती म्हणाली, “लसीकरणाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्य़ा प्रत्येकासाठी, जागरुकतेसाठी ठीक आहे. पण कृपा करून इतकी ओव्हर अ‍ॅक्टिंग करू नका ते खूप त्रासदायक वाटतं” असं म्हणत आशाने व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

यासोबतच कॅप्शनमधूनही तिने व्हिडीओ शेअर करणाऱ्या कलाकारांचा खरपूस समाचार घेतला आहे. तिने लिहिलंय, ” प्लिज यार..आणि हा लोक विचारत आहेत व्हिडीओग्राफर स्वत: घेऊन जाता की रुग्णालयाकडून पुरवला जातो.” असं आशा म्हणाली आहे. आशाच्या या पोस्टवर अनेक टेलिव्हिजन कलाकारांनी कमेंट करत तिच्या पोस्टला पसंती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MsNegi (@ashanegi)

अभिनेत्री निया शर्मा कमेंटमध्ये म्हणाली, ” माहित नाही अजून काय काय पाहावं लागेल आणि कुणा कुणाला” तर अनेक चाहत्यांनी देखील आशाच्या या पोस्टला पसंती दिलीय.

वाचा: “मास्क घातलं तर दिखावा कसा करणार!”; लसीकरणाच्या ‘त्या’ व्हिडीओमुळे दिव्या खोसला ट्रोल

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री अंकिता लोखंडेने लसीकरणाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत ती घाबरून देवाचं नामस्मरण करताना दिसत होती. मात्र अंकिताच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी ती ड्राम करत असल्याचं म्हंटलं होतं. तर अभिनेत्री दिव्या खोसला देखील लसीकरणाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर ट्रोल झाली. लस घेताना मास्क काढल्याने दिव्याला ट्रोल करण्यात आलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 6:31 pm

Web Title: actress asha negi hit back celebrities who post videos of vaccination kpw 89
Next Stories
1 ‘बाबा… तुमच्याशिवाय…’, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीची भावुक पोस्ट
2 लेकीचे पत्र पाहून शुभांगी गोखलेंना अश्रू अनावर, व्हिडीओ व्हायरल
3 …तर पूर्ण चेहरा भिंतीवरील फ्रेममध्ये दिसेल -सोनू निगम
Just Now!
X