News Flash

ऐश्वर्यानंतर दीपिकासारखी दिसणारी व्यक्ती चर्चेत, फोटो पाहून व्हाल थक्क

कोण आहे ही व्यक्ती?

काही दिवसांपुर्वी बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सारखी दिसणारी एक मुलगी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. आता बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदूकोण सारखी दिसणारी व्यक्ती समोर आली आहे.

दीपिकासारखी दिसणारी व्यक्ती कुणी तरुणी नसून तो आहे पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा. फहादचे दीपिकासोबत कोलाज केलेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत फहाद दीपिकासारखा दिसत आहे. त्याचा चेहरा दीपिकासोबत जुळत असल्याचं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, “जर फहादच्या चेहऱ्यावरून दाढी काढली तर तो थोडा दीपिकासारखा दिसेल.”

अनेकांनी यावर नाराजी व्यक्ती केली आहे. एक म्हणाला, “कृपया हा फोटो काढून टाका यामुळे मला वाईट वाटतं आहे.” दुसरा म्हणाला की, “फहाद मुस्तफा दाढीत ही दीपिकासारखा दिसतो हे सत्य आहे.”

दीपिकाचा ’83’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पती रणवीर सोबत दिसणार आहे. ५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. याआधी दीपिका ‘छपाक’ चित्रपटात दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 7:41 pm

Web Title: after aishwarya rai bachchan fans found the look a like of deepika padukone named fahad mustafa dcp 98
Next Stories
1 डॉक्टर डॉनच्या सेटवर ‘पावरी चल रही है’
2 सर्जरीनंतर अमिताभ यांनी शेअर केला पहिला फोटो
3 करिश्मा का करिश्मा.. फिटनेस पाहून व्हाल थक्क!
Just Now!
X