19 January 2020

News Flash

एक ट्विट अन् विवेकनं सलमानलाही टाकलं मागे

सलमानऐवजी नेटकऱ्यांना विवेकबद्दलची उत्सुकता अधिक

सलमान खान, विवेक ओबेरॉय

एग्झिट पोल जाहीर झाल्यानंतर शेअर केलेल्या एका मीममुळे अभिनेता विवेक ओबेरॉय चांगलाच वादात सापडला. एग्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नव्हे हे गमतीशीरपणे सांगणारा सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचा मीम विवेकने शेअर केला होता. त्यावरून राजकीय नेत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली तर राज्य व केंद्रीय महिला आयोगानं नोटीसही पाठवली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे गुगलवर नेटकऱ्यांना विवेकबद्दलची इतकी उत्सुकता वाढली की सर्चमध्ये त्याने सलमान खानलाही मागे टाकलं.

20 मे रोजी विवेकने एग्झिट पोलसंदर्भातला मीम शेअर केला होता. त्या दिवशी त्याला गुगलवर सलमानपेक्षाही अधिक सर्च केलं गेलं. किंबहुना तेव्हापासून विवेकच्या सर्चमध्ये वाढ झाली. गुगल ट्रेण्डच्या मते पुद्दुचेरी, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गोवा या राज्यांमध्ये विवेकबाबत सर्च केलं गेलं. दरम्यान शेअर केलेल्या मीमवरून होणारा वाद पाहता विवेकने ते ट्विट डिलीट कर माफी मागितली आहे.

काय आहे मीममध्ये?
एग्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर विवेकने एका मीमच्या माध्यमातून ऐश्वर्या रायचा भूतकाळ समोर आणला. या मीममध्ये तीन फोटो आहेत. पहिल्या फोटोत ऐश्वर्या राय सलमान खानसोबत असलेला फोटो आहे त्याखाली ओपिनियन पोल असे लिहिले आहे. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या राय असा फोटो आहे. त्या फोटोतएग्झिट पोल असे लिहिले आहे. त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अराध्या यांचा फोटो आहे त्याफोटोखाली रिझल्ट असं लिहिलं आहे. हे मीम विवेक ओबेरॉयने तयार केलेले नाही. मात्र ते शेअर करत हे मीम आपल्याला खरोखरच आवडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. या मीमबरोबर विवेकने हे खूप क्रिएटिव्ह आहे. हे राजकारण नाही, फक्त आयुष्यच समजा, असं त्याने म्हटलं आहे.

First Published on May 22, 2019 4:30 pm

Web Title: after sharing meme of aishwarya rai bachchan vivek oberoi beats salman khan in this way
Next Stories
1 इम्रान खानच्या घटस्फोटाच्या बातमीवर सासू म्हणते..
2 ‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये शाहरुख खान ?
3 जाणून घ्या, ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वाचे कोण करणार सूत्रसंचालन ?
Just Now!
X