News Flash

सुझेन आणि सोहमचे प्रेम प्रकरण येणार शुभ्रासमोर

‘अंग्गबाई सूनबाई’ मालिकेत नवे वळण

झी मराठीवरील ‘अंग्गबाई सूनबाई’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत शुभ्राचं रुप खूप वेगळं आहे, ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. तसेच मालिकेत शुभ्राचा पती सोहमचे अफेअर असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि ते शुभ्रा समोर येणार असल्याचे आगामी भागात दाखवण्यात येणार आहे.

‘अग्गबाई सूनबाई’ या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, शुभ्रा अशी आहे कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्या वेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड.

‘अग्गबाई सूनबाई’ मालिकेच्या आगामी भागात शुभ्राला मोठा धक्का बसणार आहे, कारण सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण तिच्या समोर येणार आहे. शुभ्रा हा धक्का पचवू शकेल? आसावरी आणि अभिजित सुनेच्या बाजूने उभे राहणार आहेत हे नक्की. मनाने खचलेल्या शुभ्राच्या आयुष्यात येणारी नवीन व्यक्ती कोण असेल? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात मिळणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 3:27 pm

Web Title: aggabai sunbai serial update avb 95
Next Stories
1 ‘नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश’, आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत
2 किरण खेर यांची करोनाबाधितांसाठी मदत; खासदार स्थानिक विकास निधीतून दिले १ कोटी!
3 ट्विंकल खन्नाने दिली आनंदाची बातमी; थेट लंडनहून मागवले १२० ऑक्सिजन सिलेंडर्स
Just Now!
X