News Flash

Video: अभिषेकचा फोन चोरुन पाहायची ऐश्वर्या? अनेक प्रश्नांची दिली उत्तरं

एक दशकापेक्षाही अधिक काळांचा या दोघांचा सुखी संसार आहे. ऐश्वर्या एक परफेक्ट आई, बायको आणि सून आहे

ऐश्वर्या राय- बच्चन आणि अभिषेक बच्चन

बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे पाहिले जाते. २० एप्रिल २००७ मध्ये दोघांनी लग्न केले. एक दशकापेक्षाही अधिक काळांचा या दोघांचा सुखी संसार आहे. ऐश्वर्या एक परफेक्ट आई, बायको आणि सून आहे. ती माझ्या आयुष्यात आली ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे असे अभिषेक अनेक मुलाखतीत म्हणतो. अभी- अॅशचे चाहते त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या आयुष्यात नेमकी घडतेय तरी काय हे जाणून घेण्यात ते उत्सुक असतात.

ऐश्वर्याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारला की, तू कधी अभिषेकचा फोन त्याच्या नकळत तपासला का? या प्रश्नाचे उत्तर देताना तिने, कधीच नाही असे उत्तर दिले. तिचे हे उत्तर अनेकांना पटेल असे नाही. पण ऐश्वर्याने कधीच अभिषेकचा यपोन तपासला नाही या उत्तरावर ती ठाम होती. अॅशचा अभीवर पूर्ण विश्वास आहे हेच यातून दिसून येते.

अभिषेक आणि ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे ‘कुछ ना कहो’ हा त्यांचा एकत्र काम केलेला पहिला सिनेमा. यानंतर त्यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ सिनेमातही काम केले होते. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. ‘गुरू’, ‘सरकार २’, ‘उमराव जान’, ‘धूम २’ सिनेमांत त्यांनी एकत्र काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 2:13 pm

Web Title: aishwarya abhishek wedding anniversary aishwarya never check husband abhishek bachchan phone
Next Stories
1 पुन्हा एकदा शाहिद कपूर होणार बाबा
2 अनोख्या रंगसंगतीने खुललं ‘रणांगण’
3 जगप्रसिद्ध डीजे एविचीचे वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी मस्कतमध्ये निधन
Just Now!
X