सोनी मराठी वाहिनीवर ‘श्रीमंताघरची सून’ ही नवी मालिका ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होत आहे. नुकताच याचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रूपल नंद आणि यशोमान आपटे ही जोडी या मालिकेत पाहायला मिळणार आहे. एवढंच नाही तर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हेही बऱ्याच काळाने एकत्र भूमिका साकारत आहेत.

या मालिकेत ऐश्वर्या नारकर या स्वभावाने अत्यंत साध्या असलेल्या सासूची भूमिका साकारणार आहेत तर या सासूला श्रीमंताघरची सून मिळणार आहे. आधीच घरात असलेल्या दोन श्रीमंताघरच्या सुनांच्या अनुभवानं ही येणारी नवी सून कशी असेल असा प्रश्न त्यांना पडला आहे.

आणखी वाचा : धनश्री काडगावकरचं बेबी बंपसह नवीन फोटोशूट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरात येणाऱ्या नवीन सूनेमुळे काय काय नवीन बदल होतील हे मालिकेच्या कथानकात पाहायला मिळेल. ‘श्रीमंताघरची सून’ ही मालिका 26 ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होणार आहे.