22 January 2021

News Flash

Video: ‘अजयला जेव्हा कळलं की मला करोना झालाय, तेव्हा…’, अभिषेकने केला खुलासा

अभिषेकने कपिल शर्मा शोमध्ये खुलासा केला आहे.

करोना महामारीला आटोक्यात आणण्यासाठी भारत सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लवकरच देशात प्रत्यक्ष लसीकरणास देखील सुरूवात होणार आहे. पण आजवर अनेकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये बॉलिवूड कलाकारांचा देखील समावेश आहे. जुलै महिन्यात अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना करोना झाला होता. आता अभिषेकने खुलासा केला की जेव्हा त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे अजय देवगणला कळाले तेव्हा त्याने त्याला फोन केला होता.

लवकरच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा’मध्ये अजय देवगण आणि अभिषेक बच्चनची एण्ट्री होणार आहे. दरम्यान शोमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक बोलताना दिसत आहे की जेव्हा त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली तेव्हा अजय देवगणने फोन केला होता. अजयने फोन करुन अभिषेकला सुनावले होते.

सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक सांगतो की त्याला जेव्हा करोनाची लागण झाली होती तेव्हा सर्वात पहिला फोन अभिनेता अजय देवगणने केला होता. त्यावेळी अजय देवगणने चिडून मला विचारले ‘हे काय झाले? कसे झाले हे?.’ त्यानंतर अभिषेक हसत म्हणतो मला नंतर आठवले काही दिवसांपूर्वी अजय आणि मी भेटलो होतो म्हणून अजयने मला फोन केला आहे. अभिषेकचे बोलणे ऐकून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हसू अनावर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 2:52 pm

Web Title: ajay devgn scolded abhishek bachchan after abhishek corona report positive avb 95
Next Stories
1 सायबर क्राइमपासून रितेश देशमुख थोडक्यात बचावला, नाही तर…
2 ‘विनाकारण संकट…’, ट्रोल होताच रिया चक्रवर्तीच्या मित्राने डिलिट केली ‘ती’ पोस्ट
3 ‘…तोपर्यंत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही’; महिला आयोग सदस्यावर भडकल्या उर्मिला मातोंडकर
Just Now!
X