‘सिंघम रिटर्न्स’च्या घवघवीत यशानंतर बॉलीवूड स्टार अजय देवगण पुन्हा एकदा अॅक्शन पटातून प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे. नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभु देवा यांच्या अॅक्शन जॅक्सन चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
पिळदार शरिरयष्टी. त्यात सिक्स पॅक अॅब्ज आणि छातीवर कोरलेला शिवा टॅटू सोबत आपल्या करारी लूकमधील गंभीरतेचा बाज यामुळे अजय देवगण चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये संपूर्णपणे भाव खाऊन जातो. ‘ना कमिटमेंट, ना अपॉईंटमेंट, ओन्ली पनिशमेंट’ असे ब्रीदवाक्य देखील या पोस्टरमध्ये देण्यात आले आहे. यावरून या चित्रपटात अॅक्शन बाज अजयची अनुभूती प्रेक्षकांना घेता येणार आहे. चित्रपटात अजयसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, यामी गौतम, मनस्वी यांच्याही भूमिका आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Oct 2014 रोजी प्रकाशित
‘अॅक्शन जॅक्सन’मध्ये अजयचे सिक्स पॅक्स आणि शिवा टॅटू
'सिंघम रिटर्न्स'च्या घवघवीत यशानंतर बॉलीवूड स्टार अजय देवगण पुन्हा एकदा अॅक्शन पटातून प्रेक्षकांची मने जिंकण्यास सज्ज झाला आहे. नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभु देवा यांच्या अॅक्शन जॅक्सन चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.
First published on: 22-10-2014 at 01:31 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajay devgns explosive look shiva tattoo six pack abs in action jackson