जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण करणारा व हजारो जणांचा जीव घेणारा करोना व्हायरस हळूहळू सर्वत्र पसरत आहे. जगभरातील अनेक देश या वरील उपचार शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. संपर्कातून करोनाची लागण होण्याचा धोका वाढत असल्यामुळे लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीमधील अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले. काही चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या तर काही म्युझिक प्रोग्राम रद्द करण्यात आले. तसेच हॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित जेम्स बॉण्डचा चित्रपट ‘नो टाइम टू डाय’ची प्रदर्शनाची तारिख देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

आणखी वाचा : लिंबू वापरुन पळवा करोना व्हायरस, प्रकाश राज यांचे ट्विट अन्…

नुकताच एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारला करोना व्हायरसचा चित्रपटसृष्टीवर होणाऱ्या परिणामाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘करोनाचा चित्रपटसृष्टीवर परिणाम होणार पण तो किती प्रमाणावर होणार हे सांगणं कठिण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असा सल्ला दिला आहे आणि सुरक्षिततेच्या उपायांना आपण गंभीरतेने घ्यायला हवे’ असे अक्षय म्हणाला.

आणखी वाचा : करोनामुळे अक्षयच्या ‘गुड न्यूज’साठी बॅड न्यूज

‘आपण स्वच्छता राखणे गरजेचे आहे. प्रत्येकाने काळजी ही घ्यायलाच हवी. लोकांना भेटल्यानंतर हात मिळवण्याऐवजी आपण हात जोडून “नमस्ते” करायला हवं’ असे अक्षय पुढे म्हणाला.