कलाकार हे नेहमी त्यांच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. एकेकाळी बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षय कुमार हा खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असायचा. पण एक दिवस अचानक अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केले आणि सर्वांना धक्काच बसला. अक्षयचे नाव हे अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. या यादीमधील एक नाव म्हणजे शिल्पा शेट्टी. एका मुलाखतीमध्ये शिल्पाने अक्षयने तिला फसवले असल्याचा खुलासा केला होता.

९०च्या दशकात अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मैं ख‍िलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची लव्हस्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते. पण २००० मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर अक्षयने २००१मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केले.

आणखी वाचा : ‘जीवन में अंधेरा हो गया बिलकुल’, मालदीवमध्ये भारतीय पर्यटकांना बंदी घालताच मीम्सचा पाऊस

शिल्पाने एका मुलाखतीमध्ये अक्षयसोबतच्या अफेअरवर वक्तव्य केले होते. या मुलाखतीमध्ये तिने पहिल्यांदाच अक्षय सोबतच्या अफेअरवर वक्तव्य केले होते. त्यावेळी तिने सांगितले होते की जेव्हा अक्षय तिच्यासोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा ट्विंकल खन्नाला देखील डेट करत होता.

‘द कपिल शर्मा’ शोमधील अभिनेत्रीने केले लग्न, पाहा फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अक्षयने केवळ माझा वापर केला. त्याच्या आयुष्यात जेव्हा दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. अक्षय केवळ एक असा व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड राग आला आहे. कारण त्याने मला फसवले. अक्षय माझ्यासोबत जसा वागला एक दिवस त्याच्यासोबतही तसेच घडेल’ असे शिल्पा म्हणाली होती. दरम्यान शिल्पा शेट्टीच्या डोळ्यात पाणी आले होते.