News Flash

नाना पाटेकरांचा नवा शिष्य अली फझल!

नाना हे चित्रपटसृष्टीतील आइनस्टाइन आहेत.

अभिनेता अली फझलने त्याच्या कलागुणांमध्ये आणखी एका कौशल्याची भर टाकली आहे. यावेळी त्याने चक्क नाना पाटेकर यांच्याकडून त्यासाठी धडे घेतले.
अली आता स्केचिंग करायला शिकलायं. यासाठी त्याला दुसरं तिसरं कोणी नाही तर नाना पाटेकर यांनीच धडे दिले. चित्रीकरणादरम्यान रिकामी वेळात नानांना आजूबाजूच्या गोष्टींचे किंवा लोकांचे स्केच काढण्याची सवय आहे. एक चांगला स्केचर कसे व्हावे यासाठी त्यांनी अलीला काही टीप्स दिल्या.
याविषयी बोलताना अली म्हणाला की, नाना हे चित्रपटसृष्टीतील आइनस्टाइन आहेत. ते खूप मोठे कलाकार आहेत. आम्ही स्केचिंगचं एक मस्त सेशन केलं. मी त्यांच्याकडून स्केचिंगच्या टीप्सही घेतल्या. नानांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. यादरम्यान मी त्यांना बराचं त्रास दिला असे मला वाटते.
प्रकाश राज यांच्या तडका चित्रपटात नाना पाटेकर, अली फझल, श्रिया सरण, तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 9:51 am

Web Title: ali fazal gets sketching lessons from nana patekar
टॅग : Nana Patekar
Next Stories
1 ‘मधु इथे अन चंद्र तिथे’चं शानदार म्युझिक लाँच
2 .. पण माझा हिरो नाल्यातून एण्ट्री घेणार- रवी जाधव
3 लॅन्डमार्क फिल्मसचं पारडं पुन्हा ‘वजनदार’
Just Now!
X