News Flash

पाकिस्तानी अभिनेत्याला सुशांतच्या मृत्यूमुळे बसला धक्का; म्हणाला…

सुशांत पाकिस्तानमध्येही होता लोकप्रिय

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या ३४व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाने कलाकारांसोबत अनेक चाहत्यांना धक्का बसला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. आता सुशांतच्या एका चाहत्यांने अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतने गळफास लावून आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. त्याच्या मृत्यूमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पाकिस्तामधील बॉलिवूड चाहत्यांनीही सुशांतसाठी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान पाकिस्तानी अभिनेता अली जफर याने सुशांतसोबतची आठवण सांगून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

“फोटो शेअर करण्यासाठी धन्यवाद शबीना. मला आजही ती रात्र आठवतेय जेव्हा मी पहिल्यांदा सुशांतला भेटलो होतो. तो बॉलिवूडमधील एक गुणवान अभिनेता होता. शिवाय चांगला मित्र आणि हसमुख व्यक्ती होता. त्याच्या आत्महत्येमुळे आम्हा सर्वांना जबरदस्त धक्का बसला आहे.” अशा आशयाची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून त्याने सुशांतला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अली जफरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

सुशांतचा थक्क करणारा प्रवास

सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जात आहे. मात्र अद्याप त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’, ‘छिछोरे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. २००९ मध्ये ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तो घरघरांत पोहोचला. त्याच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 3:28 pm

Web Title: ali zafar comment on sushant singh rajput suicide mppg 94
Next Stories
1 Video: स्टॅण्डअप कॉमेडियन स्टेजवरच कोसळला; चाचणीत करोना पॉझिटिव्ह निघाला
2 ‘हाफ गर्लफ्रेंड’साठी आधी सुशांतची झाली होती निवड?; चेतन भगत यांचा ट्विट होतोय व्हायरल
3 करोनामुक्तीनंतर न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी प्रदर्शित होणार अजय देवगणचा ‘हा’ चित्रपट
Just Now!
X