News Flash

आलिया भट्टला ‘हा’ अभिनेता वाटतो रणबीरपेक्षा हॅण्डसम?

एका कमेंटमुळे या गोष्टीचा खुलासा झाला आहे

बॉलिवूडची क्यूट गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलियाला करिअरच्या सुरुवातीपासून रणबीर कपूर आवडायचा हे सगळ्यांना माहित आहे. रणबीर कतरिनासह रिलेशनशीपमध्ये असतानाही आलिया तिच्या मनातील रणबीर विषयीच्या भावना व्यक्त बेधडकपणे व्यक्त करत होती. आता आलिया आपल्या आवडत्या व्यक्तीसह रिलेशनशीपमध्ये असल्याने स्वत:ला ती नशीबवान मानते.  रणबीर जरी आलियाचा फेव्हरेट अभिनेता असला तरीदेखील ती एका दुसऱ्या अभिनेत्याला रणबीरपेक्षा हॅण्डसम समजते. विशेष म्हणजे एका कमेंटमुळे या गोष्टीचा खुलासा झाला आहे.

‘स्टुडेंट ऑफ द इअर २’ चित्रपटामध्ये नकारात्मक भूमिका साकारणारा अभिनेता आदित्य सीलने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आदित्य रणबीरसह फूटबॉल खेळताना दिसत आहे. फोटोमधील आदित्याचा लूक अनेक लोकांना आवडला आहे. अनेक चाहत्यांनी इन्स्टाग्रामवरचा हा फोटो लाईक केला आहे. तसेच चाहत्यांनी ‘माझ्या मते आदित्य सील रणबीर कपूरपेक्षाही हॅण्डसम दिसत आहे’ अशी कमेंट केली आहे. अनेकांनी या कमेन्टाला लाईक केले. नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही कमेंट लाईक करणाऱ्यापैकी एक म्हणजे आलिया. तसेच आलिया रणबीरपेक्षाही हॅण्डसम कोणीतरी वाटतय अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

‘स्टुडेंट ऑफ द इअर २’ हा चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच आदित्य सील देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 11:40 am

Web Title: alia bhatt likes the comment stating that aditya seal is more handsome than ranbir kapoor
Next Stories
1 वरुणने जपली माणुसकी, मतदान केंद्रावर आजींना दिला मदतीचा हात
2 ‘मर्दानी’ राणी पुन्हा येतेय..
3 नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दीपिकाने दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X