News Flash

करण जोहरच्या चित्रपटात दिसणार आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा

प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी 'स्टुडन्ट ऑफ द इयर' चित्रपटातील आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

| February 24, 2015 06:30 am

प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ चित्रपटातील आलिया भट आणि सिध्दार्थ मल्होत्रा ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसण्याची शक्यता आहे. मोठ्या पडद्यावर आणि जाहिरातीत एकत्र काम केलेल्या या जोडीची प्रेक्षकांवर चांगलीच भूरळ आहे. याचाच फायदा घेत त्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दिग्दर्शक महेश भट यांची मुलगी आलिया भट आणि सिध्दार्थने अलिकडेच एका शितपेयाच्या जाहिरातीचे चित्रीकरण पूर्ण केले. या जाहिरातीत ते एका प्रेमीयुगलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय लवकरच ते निर्माता करण जोहरच्या एका चित्रपटात दिसणार असल्याचे समजते. शकुन बत्रा यांचे दिग्दर्शन असलेला या चित्रपटाचे शुटिंग एप्रिल महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 6:30 am

Web Title: alia bhatt siddharth malhotra pair in karan johar next movie
Next Stories
1 आक्षेपार्ह शब्दांची यादी सेन्सॉर बोर्डाने रोखून धरली
2 पाहा: ‘कट्टी बट्टी’ चित्रपटातील कंगना राणावतचा फर्स्ट लूक
3 ऑस्करमध्ये ‘बर्डमॅन’ची भरारी!
Just Now!
X