News Flash

Video: आलियाने वरुणला केले ‘एप्रिल फूल’

अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवनने दिग्दर्शक करण जोहरच्या 'स्टूडंट ऑफ द इअर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Video : आलियाने वरुणला केले 'एप्रिल फूल'

अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन ही सर्वाधिक लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडी आहे. ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ’, ‘बद्रीनाथ की दुल्हनियाँ’, ‘स्टुडंड ऑफ द इअर’ या चित्रपटांमध्ये दोघांनी एकत्र काम केलं. त्यांची ऑफस्क्रीन मैत्रीसुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. एप्रिल फूलच्या निमित्ताने वरुण-आलियाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या आलिया आणि वरुण एका जाहिरातीसाठी एकत्र काम करत आहेत. या जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान आलिया वरुणला जोक ऐकवून ‘एप्रिल फूल’ करत असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तसेच आलियाने हा व्हिडिओ इन्टाग्रामवर शेअर करत ‘एप्रिल फूलच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कप्शनमध्ये लिहिले होते.

अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवनने दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टूडंट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ते पुन्हा एकदा करण जोहरच्या ‘कलंक’ चित्रपटात काम करणार आहेत. तसेच करणच्या या चित्रपटात माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर आणि सोनाक्षी सिन्हा अशी तगडीस्टार कास्ट झळकणार आहे. ‘कलंक’ चित्रपटाचा ट्विटरवर #KalankTitleTrack हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये असल्याचे देखील पाहायला मिळाले आहे.

‘कलंक’ व्यतिरिक्त आलिया ‘ब्रम्हास्त्र’ आणि ‘RRR’ या चित्रपटात देखील काम करणार आहे. तसेच वरुण ‘स्ट्रीट डान्सर ३डी’ आणि ‘कुली नंबर १’ या चित्रपटात काम करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 5:08 pm

Web Title: alia shared video as she can be seen teasing varun with april fool joke
Next Stories
1 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
2 सलमान-रणबीरमधील भांडण मिटणार?
3 कंगनापाठोपाठ आता ऐश्वर्यालाही व्हायचंय दिग्दर्शिका
Just Now!
X