News Flash

सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ दोन भागांमध्ये होणार रिलीज

येत्या १३ ऑगस्टला रिलीज होणार पहिला भाग

‘साऊथचा सुपरस्टार’ अल्लू अर्जुन याचा आगामी ‘पुष्पा’ चित्रपट भागांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा पूर्ण करण्यासाठी जास्त कालावधीची गरज असल्यामुळे चित्रपटाच्या मेकर्सनी हा निर्णय घेतलाय. याचा पहिला भाग १३ ऑगस्ट २०२१ मध्ये रिलीज करण्यात येणार असून पुढचा सिक्वेल २०२२ मध्ये रिलीज करण्यात येणार आहे. ‘मायथ्री मूवी मेकर्स’चे निर्माते नवीन येर्नेनी आणि वाई रविशंकर यांनी ही माहिती दिलीय.

‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज होणारा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाती पात्र आणि कथा पूर्ण करण्यासाठी आणि रंगवण्यासाठी आणखी कालावधीची गरज असल्याने हा चित्रपट दोन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज करणार असल्याचं, निर्माते नवीन येर्नेनी यांनी सांगितलं.

या चित्रपटासाठी त्यांना बडे स्टार्स, कलाकार आणि टेक्निकल टीम लाभली आहे. म्हणूनच हा चित्रपट पाहून थिएटरमधून जेव्हा प्रेक्षक बाहेर पडतील तेव्हा त्यांना अविस्मरणीय अनुभव देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असंही यावेळी निर्मात्यांनी सांगितलं.
‘आर्य’ फेम सुकुमार यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘पुष्पा’ हा चित्रपट तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांसह तेलगूमध्ये देखील रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना सुद्धा झळकणार आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटात ते दोघेही पहिल्यांदाच एकत्र स्कीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला असून यात सुपरस्टार अल्लू अर्जून रफ अ‍ॅण्ड टफ लूकमध्ये दिसून आला आहे.

या चित्रपटाची बरीचशी शूटिंग पूर्ण झाली असून काही निवडक शॉट्स शूट करणं बाकी आहे. या चित्रपटाच्या दोन्ही भागाचे फिल्म बजेट २५० ते २७० कोटीपर्यंत गेले असल्याचं देखील बोललं जातंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 3:39 pm

Web Title: allu arjuns action thriller pushpa be released two parts sequel arrive prp 93
Next Stories
1 ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी
2 परदेशात ‘राधे’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
3 ईदच्या शुभेच्छा दिल्याने कंगना रणौत ट्रोल; “तू हिंदू मुस्लिमांमध्ये भेद का निर्माण करतेस?”
Just Now!
X