प्रसिद्ध संगीतकार जोडी अरमान आणि अमल मलिक यांनी आपल्या आजीला गमवालंय. रविवार २५ जुलै रोजी कौसर जहां मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला. आजीच्या निधनानंतर मलिक कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अरमान आणि अमल हे दोघेही आजीच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या जवळ होते. त्यांची आजी ही दोघांच्याही सर्वात जवळची मैत्रीण होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने दोघांना ही खूप मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अमल मलिकने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने घेतलेला निर्णय सांगितला आहे.

अमल मलिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी शेअर केलीय. या स्टोरीमध्ये त्याने घेतलेला निर्णय फॅन्सपर्यंत पोहोचवला आहे. अमल मलिक याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सर्वच फॅन क्लबना अनफॉलो केलंय. अमलच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याची प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. पण त्यासोबतच त्याला याचा मनस्पात देखील सहन करावा लागत आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर लाखोंच्या संख्येने फॅन्स त्यांनी केलेल्या मेसेजवरील रिप्लायसाठी तसंच फॉलो बॅक साठी वारंवार मेसेज करत असतात. त्याच्या फॅन्सकडून त्याच्यासाठी असलेली ही अपेक्षा पूर्ण करणं सध्या त्याला अवघड जात आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्याने लिहिलं की, “सध्या मी एका कठिण परिस्थितीतून जात आहे…दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करतोय…आम्ही आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करून या दुःखातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय…यासाठीच मी माझ्या सर्व फॅन क्लब्सना अनफॉलो करतोय.”

amaal-malik-instagram-story
(Photo: Amaal Malik/Instagram)

यापूढे स्टोरीमध्ये लिहिताना अमल म्हणाला, “मला सर्वच अमालीयन्सवर प्रेम आहे…पण रिल लाइफसोबत रिअल लाइफला जोडणं हे फार अवघड आहे…मी घेतलेला निर्णय सांगताना मला जाणीव आहे की याचा तुम्हा फॅन्सना त्रास होणार आहे. पण मला याशिवाय काही पर्याय नाही. रविवारी माझ्या आजीचं निधन झाल्यानंतर तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या माझ्या सर्व फॅन्सचे खूप खूप आभार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Amaal Mallik (@amaal_mallik)

त्याने लिहिलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीचा शेवट करताना त्याने फॅन्सना एक आवाहन देखील केलंय. यात त्याने लिहिलंय, “कृपया एकमेकांबद्दल द्वेष बाळगू नका. आपण इंटरनेटवरील सर्वात मोठ्या म्यूजिकल फॅंडम्स पैकी एक आहोत. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या विरोधात होत असता, त्यावेळी मला फार दुःख होतं.” स्टोरीच्या अखेरीस त्याने फॅन्स एक संदेश देखील दिलाय. लवकरच तो पुन्हा भेटीला येईल, असं त्याने म्हटलंय.