लॉसएंजल्स : अॅमेझॉनच्या फ्लीबॅग या मालिकेला ७१ व्या एमी पुरस्कार कार्यक्रमात एकूण चार पुरस्कार मिळाले असून उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शन, उत्कृष्ट विनोदी मालिका या गटात या मालिकेने बाजी मारली. लंडनमध्ये राहणाऱ्या महिलेची भूमिका साकारणाऱ्या फोबी वॉलर ब्रिज यांना उत्कृष्ट लेखनाचा व उत्कृष्ट मुख्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. उत्कृ ष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दी माव्र्हलस मिसेस मेसलमधील राशेल ब्राशनन हिला किंवा व्हीपमधील ज्युलिया लुईस हिला मिळेल अशी अपेक्षा होती. ब्राशनन व ज्युलिया यांना आतापर्यंत प्रत्येकी आठ एम्मी पुरस्कार मिळालेले आहेत.
एचबीओच्या गेम ऑफ थ्रोन्स, अॅमेझॉनच्या फ्लीबॅग या मालिकांनी महत्त्वाचे पुरस्कार पटकावले. एचबीओला १३२ नामांकने होती त्यात ३२ गेम ऑफ थ्रोन्स साठी होती. या मालिकेला दोन पुरस्कार मिळाले. नेटफ्लिक्सला ११७ नामांकने होती त्यात रशियन डॉल, व्हेन दे सी अस व ओझार्क या मालिकांचा समावेश होता. त्यांना चार पुरस्कार मिळाले. अॅमेझॉनला एकूण सात पुरस्कार मिळाले आहेत. गेम ऑफ थ्रोन्सला किती पुरस्कार मिळणार हाच एक प्रश्न होता. पीटर डिंक्लेज यांना टायरियन लॅनिस्टरच्या भूमिकेसाठी सहअभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. मर्यादित मालिका व टीव्ही चित्रपट भागात चेर्नोबिल, ए व्हेरी इंग्लिश स्कँडल, व्हेन दे सी अस, द अॅक्ट यांना पुरस्कार मिळाले. ‘व्हेन दे सी अस’मधील भूमिकेसाठी झ्ॉरेल जेरोम यांना मुख्य अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
एॅमी पुरस्कार यादी
फ्लीबॅग (अॅमेझॉन)- उत्कृष्ट विनोदी मालिका
गेम ऑफ थ्रोन्स ( एचबीओ)- उत्कृष्ट नाटय़ मालिका
चेर्नोबिल (एचबीओ)- उत्कृष्ट मर्यादित मालिका
फोबी वॉलर ब्रिज ( फ्लीबॅग)- उत्कृष्ट अभिनेत्री, विनोदी मालिका
बिल हॅडर ( बॅरी)- उत्कृष्ट अभिनेता, विनोदी मालिका
जोडी कॉमर (किलींग इव्ह)- उत्कृष्ट अभिनेत्री, नाटय़ मालिका
बिली पोर्टर ( पोज)- उत्कृष्ट अभिनेता- नाटय़ मालिका
मिशेल विल्यम्स (फोसी, व्हेरडॉन)- उत्कृष्ट अभिनेत्री, मर्यादित टीव्ही चित्रपट
झ्ॉरेल जेरोम ( व्हेन दे सी अस)- उत्कृष्ट अभिनेता, मर्यादित मालिका , टीव्ही चित्रपट
अॅलेक्स बोरस्टेन (दी माव्र्हलस मि. मेसेल)- उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- विनोदी मालिका
टॉनी शालहॉब (द माव्र्हलस मि. मेसेल) उत्कृष्ट सहायक अभिनेता – विनोदी मालिका,
ज्युलिया गार्नर (ओझार्क)- उत्कृष्ट सहायक अभिनेत्री- नाटय़ मालिका
पीटर डिंकलेज (गेम ऑफ थ्रोन्स)- उत्कृष्ट सहायक अभिनेता, नाटय़ मालिका
पॅट्रिशिया आक्र्वेट ( दी अॅक्ट)- उत्कृष्ट सहायक अभिनेत्री, मर्यादित मालिका, चित्रपट
बेन विशॉ ( अ व्हेरी इंग्लिश स्कँडल) उत्कृष्ट सहायक अभिनेता, मर्यादित मालिका
ब्लॅक मिरर- बँडर स्नॅच (नेटफ्लिक्स), टीव्ही चित्रपट
लास्ट विक टुनाइट विथ जॉन ऑलिव्हर (एचबीओ)- बहुचर्चित मालिका
रूपॉल ड्रॅग रेस (व्हीएच १)- रिअॅलिटी स्पर्धा कार्यक्रम
फोबी वॉलर ब्रीज (फ्लीबॅग) – लेखिका, उत्कृष्ट विनोदी मालिका
जेसी आर्मस्ट्राँग (सक्सेशन, नोबडी इज एव्हर मिसिंग)- लेखन, नाटय़ मालिका.
क्रेग मॅझिन (चेर्नोबिल)- लेखन, मर्यादित मालिका व चित्रपट)
लास्ट विक टुनाइट विथ जॉन ऑलिव्हर (एचबीओ)- विविध मालिका लेखन
हॅरी ब्रॅडबीर (फ्लीबॅग)- दिग्दर्शन विनोदी मालिका
जॅसन बेटमन (ओझार्क)- दिग्दर्शन नाटय़ मालिका
जोहान रेन्क (चेर्नोबिल)- मर्यादित मालिका किंवा चित्रपट
डॉन रॉय किंग (सॅटरडे नाइट लाइव्ह- अॅडम सँडलर)- विविध मालिका दिग्दर्शन