‘दिल दोस्ती दुनियादारी’ असो, ‘फास्टर फेणे’ असो किंवा ‘अमर फोटो स्टुडिओ’ आपल्या अभिनयानं चाहत्यांना भुरळ पाडणार अभिनेता म्हणजे अमेय वाघ. अमेय वाघ सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. तो चर्चेत असण्यामागचं कारण म्हणजे अमेयची फेसबुक पोस्ट. गेल्या काही दिवसांपासून अमेय फेसबुक पोस्टद्वारे चाहत्यांकडून मदत मागत आहे. ‘जरा मदत हवीये तुमची, मुलीसाठी नाव सुचवा प्लीज,’ अशी पोस्ट अमेयने गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र त्याच्या या पोस्टमागचं कारण नुकतंच स्पष्ट झालं आहे.

अमेयने फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर या पोस्टवर भरभरून लाइक्स आणि कमेंट्स पाहायला मिळाल्या. इतकंच नाही तर अभिनेत्री प्रिया बापट, निपुण धर्माधिकारी यांनीसुद्धा मुलीसाठी नावं सुचवली. अमेयचं २०१७ मध्ये साजिरी देशपांडेसोबत लग्न झालं. त्यामुळे त्याच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन होणार का ? त्याच्यासाठी अमेयला नाव हवंय का ? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते. मात्र या प्रश्नांवर खुद्द अमेयनेच पडदा टाकला आहे. अमेयच्या घरात कोणताही नवा पाहुणा येणार नसून त्याचा आगामी ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रत्येक तरुण आयुष्यामध्ये एकदातरी प्रेमात पडतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये एखादी गर्लफ्रेंड असणं साहाजिकचं आहे. मात्र जे तरुण गर्लफ्रेंडच्या शोधात आहेत त्यांचं काय ? त्यामुळे सध्या अमेय नचिकेत प्रधानसाठी मुलींची नाव शोधतांना दिसत आहे. अमेय लवकरच ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटामध्ये तो नचिकेत प्रधान ही भूमिका साकारत आहेत.

या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उपेंद्र सिंधये यांच्यावर आहे. उपेंद्र यांनीच या चित्रपटाचं लेखनही केलं आहे. तर चित्रपटाची निर्मिती अनिश जोग, रणजित गुगळे, अमेय पाटीस, कौस्तुभ धामणे, अफीफा सुलेमान नाडियादवाला करणार आहे. त्यातच आता अमेयसोबत आणखी कोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.