काही दिवसांपूर्वी फैजल सिद्दिकीने टिक-टॉकवर महिलांवरील अॅसिड हल्ल्याची खिल्ली उडवणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. पण या व्हिडीओद्वारे फैजलने सोशल मीडियाचे अनेक नियम मोडल्यामुळे त्याचे टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले. आता त्या पाठोपाठ आमिर सिद्दिकीचे देखील टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, एक कास्टिंग दिग्दर्शकाला धमकावणारे मेसेज पाठविल्यामुळे आमिर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच त्या दिग्दर्शकाच्या वकिलाने, ‘माझ्या क्लायंटने केलेल्या तक्रारीनंतर आमिर सिद्दिकीचे टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे’ असे म्हटले आहे.
तसेच आमिर विरोधात दिग्दर्शकाने टिक-टॉककडेही तक्रार केली आहे. मात्र आमिरने हे सर्व आरोप फेटाळले असले तरी त्याचे टिक-टॉक अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे.
आमिरचे टिक-टॉकवर ३.८ मिलियन फॉलोअर्स होते. त्याचे टिक-टॉक व्हिडीओ चाहत्यांना विशेष आवडत होते. तसेच त्याचे इन्स्टाग्रामवर देखील पाच लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. आमिरने युट्यूब विरोधात केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत होता.