बॉलिवूड अभिनेता अमित साध सध्या ‘ब्रीद’ या नव्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये त्याने कबीर सावंत ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ही भूमिका साकारताना त्याने केलेल्या अभिनयाची सर्वत्र स्तुती होत आहे. दरम्यान ‘ब्रीद’ सीरिजच्या निमित्ताने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत अमितने एक धक्कादायक अनुभव सांगितला. वयाच्या १६ व्या वर्षी तो चक्क आत्महत्या करणार होता.

अवश्य पाहा – ‘गरीबांवर असा अत्याचार भारतातच होऊ शकतो’; तो व्हिडीओ पाहून अभिनेत्याची पोलिसांवर टीका

अमितच्या डोक्याच आत्महत्येचा विचार का आला?

“लहान असताना अनेकदा तुम्ही चूकीचे निर्णय घेता. अनुभव नसल्यामुळे असेच काहीचे निर्णय मी देखील घेतले होते. एकदा तर थेट आत्महत्या करण्याचा निर्णय मी घेतला होता. शाळेत असताना अभिनयात मला फारशी गती नव्हती. त्यामुळे मित्रमंडळी चिडवायचे. नातेवाईकांनी देखील दुसऱ्या कुठल्या तरी क्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला होता. या नकारात्मक वातावरणामुळे मी वैतागलो होतो. परिणामी नैराश्यात जाऊन आत्महत्येचे विचार डोक्यात येऊ लागले होते. परंतु त्यानंतर स्वत:ला मी सावरलं. अभिनयाचं योग्य प्रशिक्षण घेतलं. परिणामी आज मला चांगला अभिनय करता येतोय.” असा अनुभव अमितने या मुलाखतीत सांगितला.

अवश्य पाहा – “हे सारं कल्पनेच्या पलिकडलं”; मुंबईत नसतानाही अभिनेत्रीला आलं ३२ हजार वीज बिल

अमित साध भारतातील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. ‘क्यों होता है प्यार’ या मालिकेतून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘साक्षी’, ‘मिस इंडिया’, ‘कोहिनूर’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले. ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनमध्ये देखील तो झळकला होता. या शोने त्याला तुफान लोकप्रियता मिळवून दिली. परिणामी २०१० साली त्याला ‘फूंक’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ‘काय पो छे’, ‘सुलतान’, ‘अकिरा’, ‘सुपर ३०’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या. सध्या ‘ब्रीद’ या सीरिजमुळे तो चर्चेत आहे.