News Flash

बसस्टॉप आणि ती मुलगी; बीग बींच्या कॉलेज जीवनातील खास किस्सा

बसस्टॉपवरील हा किस्सा बिग बींनी सांगितला आहे

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन एकेकाळी अनेक तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवत होते. त्यांच्या चित्रपटांपासून ते अगदी त्यांच्या संवादकौशल्यापर्यंत आणि त्यांच्या आवाजात असलेल्या वजनापासून ते थेट त्यांच्या नृत्यशैलीपर्यंत साऱ्याचीच चर्चा होत असते. पण अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी देखील बिग बी तितकेच लोकप्रिय होते. त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील किस्सा एका कार्यक्रमामध्ये सांगितला होता.

अमिताभ यांनी ‘कौन बनेगा करोडपति ११’ या शोमध्ये हा किस्सा सांगितला होता. अमिताभ यांनी त्यांचे शिक्षण दिल्लीमध्ये घेतले. तेव्हा ते दिल्लीतील तीन मूर्ती येथे राहत होते. कॉलेजला जाण्यासाठी त्यांना बसने प्रवास करावा लागत होता. ते प्रवास करत असलेली बस कनॉटप्लेसहून (सीपी) त्यांना यूनिवर्सिटीला सोडत असे. ‘या रस्त्यात खासकरुन सीपीपासून आयपी कॉलेजपर्यंत, मिरांडा हाऊसला जाणाऱ्या सुंदर कॉलेजच्या मुली बसमध्ये चढत असत. आम्ही या बसस्टॉपवर सुंदर मुलींची बसमध्ये चढण्याची वाट पाहात असे’ असे अमिताभ यांनी सांगितले.

काही वर्षांनंतर माझे पदवीधर शिक्षण पूर्ण झाले आणि मी नोकरी करु लागलो. दरम्यान माझी ओळख त्या बसमध्ये चढणाऱ्या सुंदर मुलीशी झाली. त्या मुलीने मला एक मजेशीर गोष्ट सांगितली. ‘जेव्हा तुम्ही यूनिवर्सिटीमधून शिक्षण घेत होतात त्यावेळी तुमची एक झलक पाहण्यासाठी मी वाट पाहात बसायचे असे ती मुलगी म्हणली. ती दररोज तिचा मित्र प्राणसह मला पाहण्यासाठी त्या बसस्टॉपवर येत असे. माझी वाट पाहत असे’ असे अमिताभ पुढे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:04 pm

Web Title: amitabh bachan revel that they used to wait for beautiful girls at bus stop avb 95
Next Stories
1 अल्लू अर्जुनला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करिअर
2 Valentines day : अन् ‘त्या’ क्षणापासून सुरु झाला रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा प्रवास
3 ओळखा कोण आहे ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री? तिच्या सौंदर्यावर आज लाखो फिदा
Just Now!
X