News Flash

Video: ‘बिग बीं’चा अलाहाबादी अंदाज पाहिला का?

माझी जन्मभूमी आणि तिथली अवधी भाषा

अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन त्यांच्या ट्विट आणि फेसबुक पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतात. नुकताच या महानायकाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांचे फॉलोवर्स कमी झाल्याचे त्यांनी सांगितले होते. असेच फॉलोवर्स कमी झाले तर ते ट्विटर अकाऊंट सोडून देतील असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. आता त्यांनी फेसबुकवर एका जाहिरातीचा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना बिग बी यांनी लिहिले की, ‘अलाहाबादच्या आठवणी. माझी जन्मभूमी आणि तिथली अवधी भाषा. जाहिरातीचे चित्रीकरण करताना मजा आली. मी करुन दाखवलं.’ बच्चन यांनी शेअर केलेला या व्हिडिओला हजारो लाइक्स आणि शेअर आले आहेत. अनेकांनी या व्हिडिओला आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

अमिताभ यांच्या पोस्टवर धमेंद्र नावाच्या एका युझरने लिहिले की, तुम्ही अलाहबादला तर प्रसिद्ध केलंय. तुमचं जेवढं कौतुक करु तेवढं कमीच आहे. विवेक वर्मा नावाच्या एका युझरने लिहिले की, फारच छान. या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन कुर्ती आणि मोठ्या मिश्यांमध्ये दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील त्यांच्या फॉलोवर्सचा आकडा कमी झाल्याने त्यांनी ट्विटरच्या दुनियेतून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘थँक्यू फॉर द राईड’ असे लिहिले होते. ट्विटरच्या या अनोख्या दुनियेला त्यांनी समुद्राची उमपा देत या समुद्रात इतरही काही मासे म्हणजेच ट्विटर युजर्स आहेत, जे अनेकांनाच आवडतात असे लिहिले.

‘एएनआय’च्या वृत्तानुसार ट्विटरवर इतरही असे काही सेलिब्रिटी युजर आहेत ज्यांच्या फॉलोअर्सचा आकडा बिग बींच्या फॉलोअर्सच्या आकड्याहूनही जास्त आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानच्या ट्विटर अकाऊंटकडेच अनेकांच्या नजरा वळल्या आहेत. सर्वाधिक फॉलोअर्सच्या शर्यतीत शाहरुख अमिताभ बच्चन यांना मागे टाकतोय. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

सध्याच्या घडीला ३,२९,४१,८३७ या आकड्यासह बी टाऊनमधील सर्वाधिक फॉलो केले जाणाऱ्यांच्या यादीत शाहरुखने बाजी मारली. तर, ३,२९,०२,३२० इतक्या फॉलोअर्ससह बिग बींचे नावसुद्धा या यादीत समाविष्ट आहे. पण, येत्या काळात शाहरुखच्या फॉलोअर्सचा वाढता आकडा आपल्या लोकप्रियतेवर परिणाम तर करणार नाही ना, याच चिंतेने बहुधा अमिताभ बच्चन यांनी या टिवटिवीकरणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 6:58 pm

Web Title: amitabh bachcahn ad shoot video share on facebook post
Next Stories
1 या ज्येष्ठ अभिनेत्रीमुळे अदितीला मिळाली खिल्जीच्या पत्नीची भूमिका
2 ‘हम आपके है कौन’च्या सिक्वलमध्ये या जोडीला पाहायला तुम्हालाही आवडेल
3 हे राम! म्हणत नथुराम घेणार कायमची एग्झिट
Just Now!
X