05 March 2021

News Flash

‘शमिताभ’मध्ये मी आणि रेखाने एकत्रित काम केले नाही- अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन आणि रेखा या हीट जोडीला अनेक वर्षांनी पडद्यावर एकत्र पहायला मिळणार असल्यामुळे आर.बाल्की दिग्दर्शित 'शमिताभ' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली

| January 7, 2015 04:11 am

अमिताभ बच्चन आणि रेखा या हीट जोडीला अनेक वर्षांनी पडद्यावर एकत्र पहायला मिळणार असल्यामुळे आर.बाल्की दिग्दर्शित ‘शमिताभ’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, आम्ही दोघांनी प्रत्यक्षात एकत्रित चित्रीकरण केलेले  नाही, असे सांगत अमिताभ यांनी चाहत्यांचा काहीसा हिरमोड केला. आमच्यावरील दृश्ये वेगवेगळी चित्रित झाली असली तरी, ती विशिष्ट क्रमवारीत एकत्र आणली असल्याचे चित्रपट पाहताना तुमच्या लक्षात येईल. मात्र, रेखासारखी व्यक्ती चित्रपटात असणे आमच्यासाठी भाग्याची बाब असल्याचे अमिताभ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आर.बाल्की आम्हा दोघांना घेऊन एक चित्रपट करायचे म्हणत होता. अन्य कोणाबरोबर हा योग जुळून आल्यास तसा विचार करण्यास काही हरकत नाही, असेही अमिताभ यांनी सांगितले. या चित्रपटातील माझे संपूर्ण संवाद प्रत्यक्ष चित्रीकरणाअगोदरच रेकॉर्ड करण्यात आले होते. त्यामुळे चित्रीकरण सुरू असताना याच रेकॉर्डिंगसचा आणि अगोदर चित्रित केलेल्या दृश्यांचा वापर केला जात असे. चित्रीकरणादरम्यान, फक्त मी सांगतो तसे करा, असे बाल्की मला वारंवार सांगत असे. मी यापूर्वी कधीही अशाप्रकरे काम केलेले नाही. या सगळ्याचे श्रेय आर.बाल्कीला जात असल्याचे अमिताभ यांनी सांगितले.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2015 4:11 am

Web Title: amitabh bachchan rekha and i dont share screen space in shamitabh
Next Stories
1 ‘पीके’मध्ये काहीही आक्षेपार्ह नाही – दिल्ली उच्च न्यायालय
2 निर्मात्याने ३ महिने डांबले, शिवसेनाप्रमुखांनी सोडविले – सुप्रिया पाठारे
3 सोनमचा नवा अवतार
Just Now!
X