News Flash

अमृता खानविलकरला  अमिताभसोबत झळकण्याचा योग

बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ अर्थातच अमिताभ बच्चन यांची जादू अद्याप ओसरलेली नाही.

समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती निष्ठेने सामाजिक कार्य करत असतात.

‘स्टार प्लस’ वाहिनीवर आज कार्यक्रमाचे प्रसारण

बॉलीवूडचे ‘शहेनशहा’ अर्थातच अमिताभ बच्चन यांची जादू अद्याप ओसरलेली नाही. बालीवूडचा मोठा पडदा गाजविल्यानंतर बच्चन हे छोटय़ा पडद्याकडे वळले आणि ‘कौन बनेगा करोडपती’च्या निमित्ताने छोटा पडदाही गाजविला. अमिताभ यांचा ‘आज की रात हे जिंदगी’ हा नवा कार्यक्रम ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरू होत असून कार्यक्रमाच्या पहिल्या भागात बच्चन यांच्याबरोबर मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर झळकणार आहेत.

समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती निष्ठेने सामाजिक कार्य करत असतात. अशा काम करणाऱ्या व्यक्तींना कार्यक्रमात बोलाविण्यात येणार असून त्यांच्या मनातील सुप्त इच्छा पूर्ण केली जाणार आहे. अंध कलाकार हेमलता आणि त्यांचा वाद्यवृंद पहिल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हेमलता यांनी अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर यांच्यासोबत एका लावणीवर नृत्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती या कार्यक्रमानिमित्ताने पूर्ण होणार आहे. रविवारी, १८ ऑक्टोबरला ‘स्टार प्लस’ वाहिनीवर हा खास पहिला भाग पाहायला मिळणार आहे. दस्तुरखुद्द ‘बिग बी’ अर्थात अमिताभ बच्चन संवादक असलेल्या या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात अमिताभ यांच्याबरोबर काम करायला मिळाल्यामुळे अमृता खूश आहे. हेमलता यांच्या सामाजिक कामाचाही अमृताने गौरव केला असून माझ्याकडून त्यांना मी सर्वतोपरी मदत करेन, असा शब्दही अमृताने हेमलता यांना दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 2:41 am

Web Title: amruta khanvilkar take selfie with amitabh
Next Stories
1 ‘दगडाबाईची चाळ’ चित्रपटात विशाखा सुभेदार प्रमुख भूमिकेत
2 लोभासाठी वाटेल ते करणा-या राजकारण्याच्या भूमिकेत भरत जाधव
3 ‘ते आठ दिवस’ चा फर्स्ट लूक लॉन्च
Just Now!
X