News Flash

बायकोसाठी कायपण! सोनमला ‘आनंद’ देणारा हा फोटो पाहाच

याआधीही असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद अहुजा गेल्याच वर्षी लग्न बंधनात अडकले. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या लवी-डवी आयुष्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. तसेच त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर नेहमी व्हायरल झालेले पाहायला मिळतात. आतादेखील सोनम आणि आनंदचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सोनमचा पती आनंदने नुकताच मुंबई येथे एक नवे दुकान उघडले आहे. या दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सोनम आणि आनंद एकत्र पोहोचले होते. त्यादरम्यान सोनमच्या बुटाची लेस सुटली आणि ती लेस बांधण्याचे काम सोनमचा पती आनंदने केले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये सोनम आणि आनंदने सारख्याच रंगाचे बूट घातले आहेत.

याआधीही असा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी पत्नी साक्षीला सँडल घालण्यास मदत करत असल्याचे दिसले होते. तो फोटो पाहताच चाहत्यांनी साक्षी आणि धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला होता. असाच सोनम आणि आनंदचा फोटोदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

२०१८ मध्ये सोनम आणि आनंदने शीख परंपरेनुसार लग्नगाठ बांधली. सध्या ही जोडी बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. लग्नानंतर सोनम तिच्या करिअरकडे वळली असून ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात ती झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 6:45 pm

Web Title: anand ahuja goes down on his knee to tie sonam kapoor shoelaces
Next Stories
1 कंगना रणौतचा ‘मेंटल है क्या’ वादाच्या भोवऱ्यात; चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी
2 फॅशनच्या दुनियेत ‘हार्पिक’ स्वागत; रणवीरचा हा फोटो पाहिलात का?
3 ‘ह.म.बने तु.म.बने’ : नात्यांची आंबटगोड रेसिपी
Just Now!
X