‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावंच लागतं,’ असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरू झालेली ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका आणि त्यातल्या व्यक्तिरेखा आता घराघरातून लोकप्रिय झाल्या आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी स्वावलंबी राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी ‘नखरेल’ शनाया आणि या दोघींनाही खेळवणारा गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. सध्या मालिकेत राधिकाचा संघर्ष आणखी मोठा झाला असून यानिमित्ताने ती एक यशस्वी उद्योजिका म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. यासाठी राधिकाचा पूर्ण मेकओव्हर अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत राधिकाचा मेकओव्हर होतोय. आनंद, पानवलकर, जेनी, दामलेकाका, समिधा आणि रेवती या सगळ्यांच्या सोबतीने ती स्वत:ची कंपनी सुरू करतेय. राधिका आता उद्योजिका म्हणून रसिकांच्या भेटीला येत आहे. आपल्या मुलाकडे अथर्वकडे दुर्लक्ष न करता ती हा डोलारा उभा करणार आहे. हा भाग तुम्हाला ‘झी मराठी’वर येत्या ३० मार्चला रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. गुरुनाथला दिलेले आव्हान राधिका पूर्ण करणार आहे. राधिकाचं हे बदललेलं रूप आणि त्यामुळे गुरुनाथ- शनायाची उडालेली तारांबळ, येत्या काही भागांत तुम्हाला पाहता येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2018 रोजी प्रकाशित
राधिकाचा मेकओव्हर
‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावंच लागतं
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-03-2018 at 01:26 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anita date makeover in mazhya navryachi bayko