छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. अंकिताचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताने ‘पवित्र रिश्ता २’ या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अंकिताने याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली होती. आता अंकिताने आणखी एक पोस्ट सोशल मीडियवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘पवित्र रिश्ता २’ मालिके संबंधीत एक नवीन खुलासा केला आहे.
अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. हे मालिकेचं पहिलं मोशन पोस्टर आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला ‘पवित्र रिश्ताचं’ थीम गाणं बॅकग्राऊंडला प्ले होताना दिसतं आहे. हे मोशन पोस्टर पाहिल्यानंतर चाहत्यांना नक्कीच आनंद झाला असेल. हे मोशन पोस्टर शेअर करत ‘कधी कधी काही गोष्टी आपल्याला प्रेमावर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात,’ अशा आशयाचे कॅप्शन अंकिताने दिले आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा : ‘द फॅमिली मॅन’मधील सुचीचं खऱ्या आयुष्यातील लग्न ही वादात!
हे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘तुम्ही पवित्र रिश्ता २ का आणत आहात, सुशांत शिवाय पवित्र रिश्ता पाहयची इच्छा होतं नाही.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘मी नाही बघणार.. मी फक्त आधीचं पवित्र रिश्ता बघते..सुशांत शिवाय सगळं असून ही ते सगळं पूर्ण नाही, मला त्याची आठवण येते.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सुशांत भाई गेले तेव्हा पासून आमच्या घरात मालिका कोणी पाहत नाही.’

आणखी वाचा : “ए आर रहमान कोण आहे?, ‘भारतरत्न’ माझ्या वडिलांच्या पायाच्या नखाच्या बरोबरीचा”
‘पवित्र रिश्ता २’ ही मालिका झी ५ वर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात अंकिता तिच्या जुन्या अवतारात म्हणजेच अर्चनाच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरीकडे, सुशांतच्या जागी शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार आहे. सगळ्यात आधी ही भूमिका दिवंग अभिनेता सुशांत सिंग राजपुतने साकारली होती. त्यानंतर हितेन तेजवानीने ही भूमिका साकारली.