अभिनेत्री अंकिता लोखंडे कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अनेकदा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी निगडीत काही गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करते. यातच मकरसंक्रांतनिमित्ताने तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. अंकिताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती सुशांतच्या आठवणीत भावूक झाल्याचं म्हटलं जात आहे.
मकरसंक्रांत निमित्त प्रत्येक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या अंकिताने पतंग उडवताना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ‘काई पो चे’ या चित्रपटातील गाणं बॅकग्राऊंडला सुरु असल्याचं ऐकू येत आहे.
View this post on Instagram
“हे गाणं ऐकून आजही अंगावर काटा येतो. काय चित्रपट होता तो. खूप आठवणींसोबत”, असं कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिलं आहे.
वाचा : अभिनेता अली जफरवर पुन्हा लैंगिक अत्याचाराचा आरोप
दरम्यान, ‘काई पो चे’ या चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘छिछोरे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘केदारनाथ, ‘सोनचिडिया’,’दिल बेचारा’,’पीके’, ‘एम.एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र, १४ जून २०२० रोजी त्याचं निधन झालं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 15, 2021 1:15 pm