News Flash

VIDEO : “सुशांतला न्याय मिळायलाच हवा”; अनुपम खेर यांनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

सुशांत मृत्यू प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं हे तर भ्याडपणाचं लक्षण

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर अभिनेते अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुशांतला न्याय मिळालाच हवा, या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं हे भ्याडपणाचं लक्षण आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.

अवश्य पाहा – सोनू सूदच्या साथीदाराला पोलिसांनी मारली होती थोबाडीत; कारण…

अवश्य पाहा – नैराशावर अशी करा मात? अभिनेत्रीने एक मिनिटाच्या फिल्ममध्ये सांगितले उपाय

अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी सुशांत प्रकरणावर भाष्य केलं आहे. “या प्रकरणावर आतापर्यंत मी काहीच बोललो नाही कारण कळतच नव्हतं काय बोलावं. पण सद्य स्थिती पाहाता या प्रकरणाचा आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करायला हवा. एक व्यक्ती म्हणून, एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, एक अभिनेता म्हणून, सहकलाकार म्हणून आपण सुशांतची स्तुती केली आहे. त्याने केलेल्या चांगल्या कामाचं कौतुक केलं आहे. आता शांत राहणं योग्य ठरणार नाही. सुशांतला न्याय मिळायलाच हवा. खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळायलाच हवी.” असं म्हणत अनुपम खेर यांनी सुशांत मृत्यूप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे

१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 6:27 pm

Web Title: anupam kher comment on sushant singh rajput death case mppg 94
Next Stories
1 “सुशांत सिंहच्या असिस्टंट मॅनेजरची बलात्कार करून हत्या”; नारायण राणे यांचा गौप्यस्फोट
2 अभिनेत्याने तृतीयपंथी व्यक्तीकडे मागितले डान्स केल्याचे पैसे; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 भारतीय नाट्यसृष्टीत क्रांती घडवणारे ज्येष्ठ नाट्यकर्मी इब्राहिम अलकाझी काळाच्या पडद्याआड
Just Now!
X