News Flash

अनुराग कश्यपवर झालेल्या आरोपांवर मुलगी आलियाने सोडलं मौन, म्हणाली…

फादर्स डेच्या निमित्ताने आलियाने अनुराग कश्यपसोबत केलेला ब्लॉग चांगलाच चर्चेत आला होता.

(photo-instagram@anuragkashyap10)

बॉलिवूड दिग्शर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. आलिया तिच्या रिलेशनशिप मुळे तसंचं तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आली आहे. नुकताच आलियाने वडील अनुराग कश्यपवर करण्यात आलेल्या मीटू आरोपांवर खुलासा केलाय. अनुराग कश्यपवर करण्यात आलेल्या आरोपांचा आलियावर कशाप्रकरे परिणाम झाला यावर तिने भाष्य केलंय.

या मुलाखतीत आलिया म्हणाली, “जेव्हा मीटू (#Me Too) मोहिमेत वडिलांवर आरोप करण्यात आले तेव्हा मी खूप चिंतेत होते. त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला गेला ज्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. काही लोक म्हणायचे की तो वाईट व्यक्ती आहे. मात्र माझ्या जवळच्या कुणालाही विचारा, सगळे हेच म्हणतात ती माझे वडील आता पर्यंतचे सर्वात सॉफ्ट टेडी बिअर आहेत.” असं आलिया म्हणाली.

हे देखील वाचा: Raj Kundra Porn case: विनाकारण उमेश कामतला मन:स्ताप; खात्री न करता वापरला त्याचा फोटो

पुढे आलिया म्हणाली, “खरं तर मला या गोष्टीचा संताप येत नाही तर चिंता वाटते. मला माहितेय माझ्या वडिलांबद्दल जे लोक असं वाईट बोलतात त्यांच्याकडे आयुष्यात करण्यासाठी काहीच नाहीय. माझे वडील त्यांच्या अनेक गोष्टी माझ्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. माझी चिंता वाढू नये असचं त्यांना वाटतं.” असं आलिया म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

फादर्स डेच्या निमित्ताने आलियाने अनुराग कश्यपसोबत केलेला ब्लॉग चांगलाच चर्चेत आला होता. यात आलियाने वडीलांना काही बेधडक प्रश्न विचारले होते. “जर तुमची मुलगी तुम्हाला मी गरोदर आहे असं म्हणाली तर तुमची काय प्रतिक्रिया असेल?” असा प्रश्न आलियाने अनुरागला विचारला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 4:07 pm

Web Title: anurag kashyap daughter aaliya reacts allegations on dad while metoo kpw 89 kpw 89
Next Stories
1 ‘सिटी ऑफ ड्रिम्स २’चा ट्रेलर प्रदर्शित, पाहायला मिळणार सत्तेसाठी बाप-मुलीत सुरु असणारा लढा
2 “एकदा तरी स्वतः…” सिद्धार्थ चांदेकरची ‘ही’ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
3 रसिका सुनीलचा बॉयफ्रेंडसोबतचा ‘हा’ फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल
Just Now!
X