News Flash

अर्जुनचं ‘फरक ओळखा’ चॅलेंज जान्हवीने जिंकलं!

जान्हवी कपूरची भन्नाट कमेंट; चाहत्यांनीही घेतला सहभाग

अभिनेता अर्जुन कपूरने काल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन फोटो शेअर केले आहेत. पण हे फोटो शेअर करताना त्याने एक चॅलेंजही दिलं आहे आणि त्याची बहीण तसंच अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या भन्नाट उत्तराने हे चॅलेंज आणि नेटकऱ्य़ांचं मनही जिंकलं. याबद्दल विस्ताराने जाणून घेऊया.

अभिनेता अर्जुन कपूरने काल त्याचे दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले.या दोन्ही फोटोंमध्ये अर्जुन झुल्यात बसला आहे आणि त्याने आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला असल्याने त्याचे फक्त डोळे दिसत आहेत. एका फोटोमध्ये तो हसत आहे तर दुसऱ्या फोटोत थोडा गंभीर दिसत आहे. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनही दिलं. यात तो म्हणतो, “तुम्ही फरक ओळखू शकता का?” यावर अर्जुनची सावत्र बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूर हिने भन्नाट उत्तर दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

जान्हवी म्हणते, “पहिला फोटो तेव्हाचा आहे जेव्हा तुला वाटतं की आता माझं डायनिंग टेबलच्या आजूबाजूला कथ्थक करुन झालं आहे. तर दुसरा फोटो तेव्हाचा जेव्हा मी पुन्हा नाचायला सुरुवात करते.” जान्हवीची ही कमेंट अर्जुनलाही आवडलेली दिसत आहे. त्याने या कमेंटला “वाह” म्हणत उत्तर दिलं आहे.

अर्जुन आणि जान्हवी ही सावत्र भावंडे आहेत. ते ज्यावेळी एकत्र असतात, त्यावेळी जान्हवी अर्जुनसाठी कथ्थक नृत्यही करते. या संदर्भानेच तिने ही कमेंट केली आहे. जान्हवी प्रशिक्षित कथ्थक नृत्यांगना आहे. तिने बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर कथ्थक केल्याचे व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ते बऱ्याचदा व्हायरलही होत असतात.

जान्हवीसोबतच अर्जुनच्या चाहत्यांनी हे चॅलेंज स्वीकारत अनेक कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या फोटोंना पसंती दर्शवत फायर आणि हार्ट इमोजीज देत कमेंट्स केल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 2:00 pm

Web Title: arjun kapoor challengens spot the difference janhavi kapoor commented vsk 98
Next Stories
1 “ही तर फक्त सुरुवात आहे”, कंगनाचा उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्यावर निशाणा
2 “आता लसीकरण सरसकट सगळ्यांसाठी सुरू व्हायला हवं”, सोनाली कुलकर्णीची विनंती
3 रामायण मालिकेतील अभिनेत्री दिपीका चिखलिया यांच्या सासऱ्यांचं निधन
Just Now!
X