चित्रपटकर्ता बोनी कपूर यांचा मुलगा अर्जुन कपूर बॉलिवूडमध्ये हळूहळू आपला जम बसवत असून, त्याच्या ‘२ स्टेटस्’ चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला पार केला. अन्य बॉलिवूड कलाकारांप्रमणे अर्जुन कपूरनेदेखील (arjunk26) टि्वटरवर आपले खाते उघडले आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शकांपासून सर्वांनी त्याचे मोठ्या उत्साहात टि्वटरवर स्वागत केले. टि्वटरवर येताच अर्जुनने “It’s meeeee.” असा पहिला संदेश बहिण अंशुला कपूरसाठी पोस्ट केला. त्याचप्रमाणे, टि्वटरवरील खाते कसे वापरावे, यासाठी आपल्याला बहिण मदत करीत असल्याचेदेखील त्याने म्हटले आहे. ‘अर्जुन कपूर टि्वटरवर !!!!’ असा संदेश पोस्ट करीत दिग्दर्शक करण जोहरने त्याचे स्वागत केले. तर, ‘जून !! तुझे स्वागत आहे !!!’ असे म्हणत अनुष्का शर्माने त्याला टि्वटरवर वेलकम केले. याशिवाय, नर्गिस फाखरी, सोनाक्षी सिन्हा, परिणिती चोप्रा, अलिया भट आणि अन्य अनेकांनी अर्जुनच्या स्वागताचे संदेश टि्वटरवर पोस्ट केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 1:39 am