News Flash

करोनाची लागण झाल्यानंतर अक्षय कुमार रुग्णालयात दाखल, चाहत्यांना म्हणाला…

"घरी परतेन, काळजी घ्या."

गेल्या वर्ष भरापासून करोनाच संकट आपल्यावरून काही गेलेले नाही. आता तर करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. यात बॉलिवूड़वरही करोनाचं सावट पसरल्याचं दिसतंय. 4 एप्रिलला अभिनेता अक्षय कुमारला करोनाची लागण झाली. सोशल मीडियावरून अक्षयने त्याची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची बातमी दिली होती. त्यानंतर तो होम क्वारंटाइन होता.

मात्र अक्षय कुमारची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हीरानंदानी रुग्णालयात अक्षय कुमारला दाखल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरून अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. अक्षय त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला, ” तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद, तुमच्या प्रार्थनांचा प्रभाव दिसत आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून डाक्टरांच्या देखरेखीखाली राहण्यासाठी रुग्णालयात दाखल झालो आहे. आशा करतो लवकर घरी परतेन, काळजी घ्या.” अशा आशयाचं ट्विट अक्षयने केलं आहे.

रविवारी अक्षय कुमारला करोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. अक्षयने ट्विट करत करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचं सांगितले होतं. “मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आज सकाळी माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी स्वत: करोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. लवकरच अॅक्शनमध्ये परत येईल” अशा आशयाचं ट्विट करत अक्षयने त्याला करोनाची लागण झाल्याची माहिती सगळ्यांना दिली होती.

‘राम सेतु’च्या सेटवर करोनाचा उद्रेक; अक्षय कुमारनंतर 45 जणांना करोनाची लागण

दरम्यान अक्षय कुमार ‘राम सेतु’चं शूटिंग करत होता. त्यानंतर या सेटवरील 45 जणांना करोनाची लागण झाली आहे. या सर्वांना होम क्वारंटाइन करण्यात आलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 10:42 am

Web Title: askasy kumar hospitalized after tested covid positive kpw 89
Next Stories
1 शाहिद कपूरची पत्नी मीराचा बोल्ड लूक; स्विमिंग सूटला कोल्हापुरी चप्पलेची जोड
2 ‘राम सेतु’च्या सेटवर करोनाचा उद्रेक; अक्षय कुमारनंतर 45 जणांना करोनाची लागण
3 अखेर कपिल शर्माने बाळचं नाव सांगितलं; मुलाचं नाव आहे…
Just Now!
X