14 October 2019

News Flash

आमिरच्या चित्रपटाची कथा लिहिणार अतुल कुलकर्णी

१९९४ सालच्या ऑस्कर विजेता चित्रपटाचा आमिर रिमेक काढणार आहे.

आमिर खान आणि अभिनेता अतुल कुलकर्णी यांची मैत्री तशी जुनी. आमिरसोबत ‘रंग दे बसंती’ या चित्रपटात अतुल कुलकर्णीनं काम केलं होतं. अतुलच्या ‘नटरंग’मधल्या भूमिकेचंही आमिरनं भरभरून कौतुक केलं होतं. एका मुलाखतीत आमिरनं अतुलसोबत पुन्हा काम करायला आवडेल अशी इच्छाही व्यक्त केली होती आता ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कारण आमिरच्या आगामी चित्रपटासाठी अतुल कुलकर्णी कथा लिहिणार आहे.

आमिरनं ५४ व्या वाढदिवसानिमित्त आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट १९९४ सालचा ऑस्कर विजेता चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’चा रिमेक असणार आहे. अद्वेत चंदन या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून अतुल कुलकर्णी या चित्रपटाची कथा लिहिणार आहे. ‘लाल सिंग चड्डा’ असं या चित्रपटाचं नाव असणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यानं ट्विट करत अतुल कुलकर्णी ‘लाल सिंग चड्डा’ चित्रपटासाठी लेखन करणार असल्याची माहिती दिली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे तर २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

First Published on March 14, 2019 5:07 pm

Web Title: atul kulkarni will write story of amir khan new movie lal singh chadha