हे नक्की कशामुळे होत आहे हे सांगता येणार नाही, पण पुणे शहरातून मराठी चित्रपटसृष्टीला अभिनेत्रींचा लाभ होत आहे. मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, स्मिता तांबे, श्रृती मराठे वगैरे नंतर आता अतुला दुगलने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. अतुला नुकतीच आपल्या पहिल्या मराठी चित्रपटाचे चक्क बँकॉक आणि पटाया येथे चित्रीकरण करून आली. या चित्रपटात नवतारका प्रीतम, तसेच संतोष जुवेकर, उषा नाडकर्णी, हेमांगी कवी इत्यादींच्याही भूमिका आहेत. सतिश मोतलिंग दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. पण जानेवारीत पुन्हा विदेशातच चित्रीकरण आहे. अतुला या एकूण अनुभवाने रोमांचित वगैरे आहे. ‘बोकड’ नावाच्या चित्रपटात ती गर्दीचा भाग झाली होती. पडद्यावर फारच थोड्या काळासाठी ती दिसली. त्यानंतर तिने अनेक निर्माता-दिग्दर्शकांच्या भेटीगाठी घेतल्या, अश्वासने ऐकली, पण चित्रपट स्वीकारायची घाई केली नाही. तिची उंची आणि एकूणच व्यक्तिमत्व पाहाता तिला कोणी उद्याची सोनाली बेन्द्रे असेही म्हणेल. पण बँकॉकवरून तिची जी छायाचित्रे आली आहेत, त्यावरून तिला पाहताच सुश्मिता सेनची आठवण येते. तशीच मोहक, आकर्षक आणि देखणी हीदेखील आहे. मराठी चित्रपटाला अशा अभिनेत्रींची गरजदेखील आहे. अतुलाने चित्रपचसृष्टीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली असे काही होऊ देऊ नये.

atula03

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

atula02