07 March 2021

News Flash

दुसरा ‘अवतार’ लांबणीवर

चाहते ‘अवतार २’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

उत्कृष्ट अ‍ॅनिमेशन, दर्जेदार अभिनय, उत्तम पटकथा आणि योग्य दिग्दर्शन यांच्या जोरावर २००९ साली प्रदर्शित झालेला ‘अवतार’ हा चित्रपट सिनेमासृष्टीत आजवर प्रदर्शित झालेल्या सर्वात यशस्वी चित्रपटांपकी एक आहे. २,७८८ अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा जास्त पैसे कमावणाऱ्या या लोकप्रिय चित्रपटाने थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटांकडे पाहण्याचा प्रेक्षकांचा दृष्टिकोन बदलून टाकला. आता चाहते ‘अवतार २’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, दिग्दर्शक जेम्स कॅमरून यांनी सध्या ते एका दुसऱ्या प्रकल्पात गुंतल्यामुळे ‘अवतार’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचे वृत्त फेटाळले. त्यांच्या मते ‘अवतार -२’ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे सांगत त्यासाठी तेवढीच चांगल्या पटकथा लेखनाची प्रक्रिया सुरू असल्याचे स्पष्ट केले. एका मोठय़ा संशोधन प्रकल्पाप्रमाणे असलेल्या या चित्रपटात अ‍ॅनिमेशन आणि कलाकारांचे पोशाख यासाठी रिचर्ड अ‍ॅलोंझो, मिचेल बार्बर, जिल क्रोमॅक, लिंडा डेवेट्टा, जेम्स हॉनर, कॉलिन विल्सन यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींनी आपल्या कल्पनाशक्तीची परिसीमा गाठली होती. आता दुसऱ्या भागात त्याहून भव्यदिव्य असे काहीतरी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. चित्रपट पाहताना  प्रेक्षक त्याची तुलना नेहमी पहिल्या भागाशी करतात त्यामुळे दिग्दर्शक म्हणून खूप मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचे कॅमरून यांचे म्हणणे आहे.

२१५४ सालापर्यंत पृथ्वीवरील सर्व खनिजसंपत्तीचा उपभोग मानवाने घेतला असून आता त्याला नवीन ऊर्जासाठय़ाची गरज आहे. संशोधन करून मानव ‘पँडोरा’ नामक ग्रहावर पोहोचतो. तेथील अफाट खनिज संपत्ती पाहून त्या ग्रहावर कब्जा करण्याचा विचार त्याच्या मनात येतो. त्यासाठी मानवाने सुरू केलेले प्रयत्न आणि त्या ग्रहावरील रहिवाशांनी मानवजातीला केलेला विरोध दरम्यान त्यांच्यात झालेले युद्ध या अभिनव कथेवर आधारलेला ‘अवतार’ प्रेक्षकांना खूप आवडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 4:42 am

Web Title: avatar james cameron hollywood katta part 8
Next Stories
1 अम्बर रोसच्या घरी विचित्र चोरी
2 सेलेब्रिटी सूत्रसंचालक
3 चेहरे पे चेहरा
Just Now!
X