भारतात आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य सुविधांवरील ताण वाढतोय. महाराष्ट्रातही रुग्ण संख्या मोठी असून या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणताना प्रशासनाची दमछाक होतेय. बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील लोकं मदतीसाठी पुढे येत आहेत.

अशातच बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. आयुष्यमान खुरानाने सोशल मीडिया पोस्टवरून महाराष्ट्र रिलीफ फंडमध्ये मदत जमा केल्याची माहिती दिली. “गेल्या वर्षी आपण आपल्या डोळ्यांनी हे वादळ पाहिलं आहे. या माहामारीने आपल्या सर्वांना वेदना दिल्या आहेत. यावेळी आपण सिद्ध केलं की कश्या प्रकारे एकत्रीतपणे आपण या संकटाचा सामना करू शकतो.”

ही वेळ एकत्र येण्याची

पुढे या पोस्टमध्ये तो म्हणाला, ” पुन्हा एकदा या महामारीने आपल्याला संयम आणि एकजुटीने यायला सांगितलं आहे. देशभरातून लोक मदतीसाठी पुढे येत आहेत. पुढे येण्यासाठी आम्हाला प्रेरणा दिल्याबद्दल मी आणि ताहिरा या सर्वांचे आभार मानतो. जास्तीत जास्त लोकांना मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. गरजेच्या या वेळी आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा केली आहे. ही वेळ एकत्र येत एकमेकांची मदत करण्याची आहे.” असं आयुष्यमान त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.

गेल्या काही दिवसता अभिनेत्री सुश्मिता सेन तसचं अभिनेता सोनू सूद आणि अनेक कलाकारांनी पुढे येत मदत केली आहे.