News Flash

आयुष्यमान खुराना आणि तापसी पन्नूला ‘या’ मराठी वेब सिरीजची भुरळ, शेअर केला व्हिडीओ

"जेव्हा सेटवर नवा स्पॉटबॉय येतो."

मराठी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन प्लॅनेट मराठी हे ओटीटी प्लॅटफॉर्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावर अनेक मराठी वेब सीरिज येणार असून यातील काही वेब सीरिजची घोषणादेखील करण्यात आली आहे. यातीलच एक वेब सीरिज म्हणजे ‘हिंग पुस्तक तलवार’.

काही दिवसांपूर्वीच ‘हिंग पुस्तक तलवार’ या वेब सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी हा या वेबसीरीजचा ‘सुपरव्हिजन’ दिग्दर्शक असेल तर त्याच्या दिमतीला मकरंद शिंदे, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे हे देखील दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या वेब सीरिजचं शूटिंग सुरू करण्यात आलं आहे. तर बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांनादेखील या भन्नाट वेबसिरीजची भुरळ पडली आहे.

आयुष्यमान खुराना आणि तापसी पन्नूनेही आपल्या सोशल मीडिया हॅन्डलवरून या वेबसिरीजचं प्रमोशन केलंय. शूटिंगच्या वेळीचा एक व्हीडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हीडीओला “जेव्हा सेटवर नवा स्पॉटबॉय येतो.” असं कॅप्शन दिलं आहे.

नावावरूनच काहीतरी हटके असणाऱ्या या वेबसिरीजची कथा सहा व्यक्तींच्या अवतीभवती फिरणारी असून ही धमाल, विनोदी वेबसिरीज प्रेक्षकांना आठ भागात पाहायला मिळणार आहे. यात आलोक राजवाडे, नील साळेकर, सुशांत घाटगे, मानसी भवाळकर, शौनक चांदोरकर, क्षीतिज दाते, केतकी कुलकर्णी, मुग्धा हसमनीस आदी दमदार कलाकार पाहायला मिळतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 5:01 pm

Web Title: ayushman khurana taapsi pannu share video of upcoming marathi web series hing pustak talwar kpw 89
Next Stories
1 अभिनेता राम कपूरच्या वडिलांचे निधन
2 “तुम्हाला लॉकडाउन नाही का?”, रणबीर कपूरचा प्रश्न
3 “बिकिनीमुळे लोक आकर्षित होतात, सन्मान देत नाहीत आणि मला तो हवा होता….”- बिकिनी शूटवर शर्मिला यांचं मत
Just Now!
X