लोकप्रिय गुजराती अभिनेता अमित मिस्त्रीचे निधन झाले. आज २३ एप्रिल रोजी अमितने अखेरचा श्वास घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे.

अमितची ‘बंदिश बँडिट्स’ ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली होती. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. या व्यतिरीक्त अमितने ‘क्या कहना’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’,’९९’, ‘शोर इन द सिटी’, ‘यमला पगला दीवाना’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्याच्या या चित्रपटांची आठव करत सिनेमा रेअरने ट्वीट करत अमितच्या निधनाची बातमी दिली आहे.

अमितने अनेक नाटकांमध्ये काम केल्यानंतर त्याला छोट्या पडद्यावर काम मिळालं. त्यानंतर त्याने २००० मध्ये प्रीति झिंटाच्या ‘क्या कहना’ या चित्रपटात भूमिका साकारली. यानंतर अमितने कधी पाठीवळून पाहिले नाही. ‘भूत पोलिस’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

एका मुलाखतीत अमितने त्याच्या शिक्षणाबद्दल आणि कॉलेजमध्ये असतातना केलेल्या अभिनयाबद्दल सांगितले होते. अमितने लॉचे शिक्षण केले होते. महाविद्यालयात असताना त्याने नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरूवात केली होती. स्पर्धांमध्ये बॉलिवूडमधील अनेक लोक परिक्षक म्हणून यायचे तेव्हाच अमितची अनेकांशी ओळख झाली. त्यानंतर तो पृथ्वी थेटरमध्ये नाचक करायचा. त्याने मकरंद देशपांडे सोबत खूप काम केले. एवढंच नाही तर तो नवरात्रीत गाणं देखील गायचा.