03 March 2021

News Flash

पुन्हा एकदा बॅटमॅन सीरिजमध्ये बेन अ‍ॅफ्लेकची एण्ट्री

जाणून घ्या, या आगामी चित्रपटाविषयी

हॉलिवूडमधील ‘बॅटमॅन’ ही सीरिज आणि चित्रपटाचे आज जगभरात असंख्य चाहते असल्याचं दिसून येतं. त्यामुळे या बॅटमॅनविषयी कोणतीही नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. विशेष म्हणजे या प्रत्येक सुपरपॉवर मुव्हीजने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहेत. त्यातच अभिनेता बेन अ‍ॅफ्लेक याने साकारलेली बॅटमॅनची भूमिका आजही अनेकांच्या स्मरणात आहे. विशेष म्हणजे बेन अ‍ॅफ्लेक पुन्हा एकदा बॅटमॅन सीरिजमध्ये झळकणार असून तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

डीसी कॉमिक बुकवर आधारित ‘बॅटमॅन द फ्लॅश’ या आगामी चित्रपटात बेन अ‍ॅफ्लेक मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन Andy Muschietti करत आहेत.

दरम्यान, यापूर्वी बेन अ‍ॅफ्लेकने यापूर्वी ‘बॅटमॅन व्हर्सेस सुपरमॅन’ आणि ‘जस्टीस लीग’ या सारख्या बॅटमॅनच्या सीरिजमध्ये काम केलं आहे. त्यांमुळे पुन्हा एकदा बेनला बॅटमॅनच्या रुपात पाहणं प्रेक्षकांसाठी एकप्रकारची पर्वणी ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 11:31 am

Web Title: ben affleck to return as batman in next movie ssj 93
Next Stories
1 ‘लवकर बरे व्हा’; एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्यासाठी रजनीकांतसह चाहत्यांची प्रार्थना
2 सोनू सूदने शेअर केली एका दिवसात मदत मागणाऱ्यांची आकडेवारी अन् म्हणाला…
3 सुशांतचं घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना केला होता मेसेज? व्हॉट्सअप चॅट आले समोर
Just Now!
X