आपल्या अचूक टायमिंग व विनोदबुद्धीने ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवत असतात. कार्यक्रमात एकमेकांची टेर खेचणारे हे कलाकार कार्यक्रमाबाहेर मात्र एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतात. याची प्रचिती ‘झी मराठी’च्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओवरून आली. या व्हिडीओत भाऊ कदमला श्रेया बुगडेच्या आवडीनिवडीबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं भाऊने बरोबर दिली. भाऊला आपल्याबद्दल इतकं माहित आहे हे पाहून श्रेयाला आश्चर्याचा धक्का बसला.

श्रेयाचा आवडता पदार्थ कोणता, असा पहिला प्रश्न भाऊला विचारण्यात आला. त्यावर नॉन व्हेज, व्हेज पुलाव आणि फराळ असे तीन पर्याय देण्यात आले. भाऊने या प्रश्नाचं उत्तर नॉन व्हेज असं दिलं. माझ्या बऱ्याच गोष्टी भाऊला माहित आहेत कारण त्यावर अनेकदा विनोद होत असतात, असं श्रेया पुढे गमतीने म्हणाली. त्यावर ‘ठीक आहे, मग मी चुकतो’ असं म्हणत भाऊने श्रेयाची मस्करी केली. त्यानंतर श्रेयाचा आवडता अभिनेता कोण या प्रश्नावर शाहरुख खान असं योग्य उत्तर भाऊने दिलं. श्रेयाला कोणत्या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटते या प्रश्नाचंही उत्तर भाऊने अचूक दिलं. श्रेया कुत्र्यांना जास्त घाबरते, असं त्याने सांगितलं. श्रेयाला फावल्या वेळेत काय करायला आवडतं, या प्रश्नावर भाऊने इन्स्टाग्राम करणे असं उत्तर दिलं. हे ऐकून श्रेया चकीतच झाली.

Businessman pushes man off terrace of five-star hotel
..आणि व्यावसायिकाने मुलाच्या मित्राला हॉटेलच्या गच्चीवरुन ढकलून दिलं, सीसीटीव्हीत कैद झाली घटना
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

आणखी वाचा : निवडणुकीच्या प्रचारातही ‘चला हवा येऊ द्या’; कलाकार उतरले प्रचारात

या खेळात फक्त तीन दोन प्रश्नांची उत्तरं भाऊला अचूक देता आली नाही. त्यापैकी एक म्हणजे श्रेयाला एखाद्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाचं आयुष्य जगण्याची संधी मिळाली तर ती व्यक्ती कोण?, असं विचारल्यावर भाऊने आलिया भट्ट उत्तर दिलं. पण श्रेयाने प्रियांका चोप्रा असं म्हटलं. त्यानंतर श्रेया जर अभिनेत्री नसती तर तिचं प्रोफेशन काय असतं असं विचारल्यावर भाऊने मार्केटिंग हेड म्हटलं. पण त्याचं उत्तर पत्रकार असं होतं. श्रेयाला झी मराठीच्या मालिकांमधील कोणतं पात्र वठवायला आवडेल, या प्रश्नाचं उत्तर मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमी हे होतं.

नऊपैकी सहा उत्तरं भाऊने बरोबर दिली होती. त्यामुळे भाऊ श्रेयाला खूप चांगल्याप्रकारे ओळखतो आणि या खेळात तो पास झाला असं म्हणायला हरकत नाही.