‘भूमी’ या चित्रपटातून संजय दत्त बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार असल्याचं सर्वांनाच माहित आहे. या चित्रपटाचा पोस्टर शनिवारी प्रदर्शित झाला. उमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटात संजूबाबा कारागृहातून सुटल्यानंतर पहिल्यांदाच पडद्यावर भूमिका साकारणार आहे. आधीच्या पोस्टरमध्ये त्याचा पूर्ण चेहरा दाखवण्यात आला नव्हता. मात्र या दुसऱ्या पोस्टरमध्ये रक्ताने माखलेला संजय दत्तचा पूर्ण चेहरा पाहायला मिळतोय. या पोस्टरमध्ये संजय दत्तची भेदक नजर विशेष लक्ष वेधून घेते. यावर्षी २२ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपटात संजूबाबा एका मुलीच्या पित्याची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात संजयसोबत आदिती राव हैदरी स्क्रीन शेअर करणार आहे. आपल्या कमबॅक चित्रपटाबद्दल बोलताना संजू बाबा म्हणाला, ‘पहिल्या दिवसापासून अद्यापपर्यंत या चित्रपटाच्या कामाचा अनुभव खूपच चांगला आहे.’ ‘भूमी’चे दोन्ही पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे.
Here's presenting the first official poster of #Bhoomi! @BhoomiTheFilm @OmungKumar @TSeries @LegendStudios1 @aditiraohydari pic.twitter.com/GndKVEfZ6q
— Sanjay Dutt (@duttsanjay) July 29, 2017
वाचा : आसाम आणि गुजरातमधील पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावला आमिर खान
‘भूमी’ चित्रपटानंतर संजय दत्तचा ‘तोरबाज’सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय त्याच्या बायोपिकचीसुद्धा शूटिंग सुरु आहे. ‘तोरबाज’ चित्रपटात तो एका सुसाइड बॉम्बर असलेल्या मुलाच्या वडिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या बायोपिकमध्ये संजय दत्त फक्त कॅमिओ करणार असून रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे.