अभिषेक बच्चनचा ‘बिग बुल’ सिनेमा प्रदर्शित झाला असून या सिनेमाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अभिषेक बच्चनने नुकतीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले होते. प्रेक्षकांनी सिनेमाला चांगला प्रतिसाद दिल्याने त्यांने प्रेक्षकांचे आभार मानत आनंद व्यक्त केला होता.अभिषेक त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला होता, “मैंने कहा बड़ा सोचो, तो आपने The Big Bull को सबसे बड़ा धमाका बना दिया.आपके प्यार के लिए शुक्रिया.” असं तो म्हणाला.

अभिषेकची पोस्ट शेअर करत बिग बी अमिताभ बच्चन यांनी लेकाचं कौतुक केलं आहे. बिग बी म्हणाले आहेत, “WHTCTW मस्त मित्रा. वडिलांचा अभिमान. जेव्हा मुलगा वडिलांचे शूज घालायला लागतो तेव्हा तो तुमचा मुलगा नव्हे मित्र होतो. खूप चांगलं केलं मित्रा” अशा आशयाचं ट्विट करत बिग बींनी अभिषेकचं कौतुक केलं आहे.

काय आहे बाप लेकाचं सिक्रेट?

तर बिग बी यांनी अभिषेक बच्चन यांचं कौतुक करत असतानाच चाहत्यांना पुन्हा एकदा कोड्यात टाकलं आहे. या ट्विटमध्ये देखील त्यांनी “WHTCTW ” चा उल्लेख केला आहे. त्यामुळे हे नेमकं काय आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेलीय. याआधी देखील त्यांनी ” आठवतंय भय्यू WHTCTW..!’ असं ट्वीट करत अभिषेकला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

“मी दिवसाला १६ कोटी कमवत असतो तर नक्कीच..”; अर्जुन कपूरचं ट्रोलरला सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांपासून बिग बी यांनी चाहत्यांसमोर मोठा सस्पेन्स निर्माण केला आहे. बिग बी यांनी अभिषेकला शुभेच्छा देताना गेल्या काही दिवसात ” WHTCTW” या अक्षरांचा अनेकदा उल्लेख केला आहे. मात्र या मागचा नेमका अर्थ काय हे चाहत्यांना समजू शकलेलं नाही.
अभिषेकचा ‘बिग बुल’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिषेक मुख्य भूमिकेत असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तर लवकरच तो ‘दसवी’ या त्याच्या आगामी सिनेमातून झळकणार आहे.