News Flash

बिग बी छोटय़ा पडद्यावर दैनंदिन मालिकेत दिसणार!

‘केबीसी’चे सहा पर्व लोकप्रिय करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आता छोटय़ा पडद्याबरोबर असलेला ऋणानुबंध आणखीन घट्ट करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी थेट दैनंदिन मालिकेत काम करण्याचा

| February 14, 2013 04:50 am

‘केबीसी’चे सहा पर्व लोकप्रिय करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी आता छोटय़ा पडद्याबरोबर असलेला ऋणानुबंध आणखीन घट्ट करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी थेट दैनंदिन मालिकेत काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ‘एबीसीएल’ या मालिकेचे सहनिर्माते आहे.
छोटय़ा पडद्यावर मिळणारी लोकप्रियता आणि इथे काम करण्याची पध्दत, वेळा हे सगळे अमिताभना आवडले असल्याने गेल्या वर्षीपासूनच त्यांनी विविध वाहिन्यांकडे चाचपणी सुरू केली होती. त्यातील काहीजणांनी अमिताभ यांच्यासमोर विविध संकल्पनाही मांडल्या होत्या. पण त्या फारशा न रुचल्यामुळे कुठल्याच प्रकल्पाला अमिताभकडून हिरवा कंदिल मिळाला नाही. आता इंडस्ट्रीच्या सूत्रांनुसार मालिका निर्मितीच्या दृष्टीने हालचाली सुरू  झाल्या आहेत. अमिताभ स्वत: मालिकेत काम करणार असल्याने मालिका भव्यदिव्य व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
अमिताभ या मालिके चा मुख्य चेहरा असले तरी ते रोजच्यारोज ते मालिकेत दिसणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाणार आहे. एकाअर्थाने त्यांची लोकप्रियता, त्यांच्याबद्दल लोकांना वाटणारे कुतूहल कुठेही कमी होणार नाही, अशा पध्दतीने मालिकेचे नियोजन के ले जात आहे. मात्र, ही मालिका टीव्हीविश्वात मैलाचा दगड ठरावी यासाठी हरएकप्रकारे प्रयत्न करण्याची अमिताभ यांची तयारी असल्याचे बोलले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 4:50 am

Web Title: big b will appier everyday on small screen
Next Stories
1 रॉबर्ट डी निरो आणि सिल्वरच्या आठवणी लघुपटातून साकारणार -अनुपम खेर
2 बादशाहाला जिंकणार कोण?
3 तर्कसुसंगत आणि उत्कंठावर्धक!
Just Now!
X